जुन्नरः पुणे जिल्ह्यातील जुन्रर तालुक्यात फेसबुकवर ओळख झालेल्या एका भटजीने महिलेसोबत धरणाच्या भिंतीवर काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आता धमकी देणाऱ्या भटजीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याची रवानगी थेट येरवडा कारागृहात केली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने ओतूर पोलिसांत भटजीविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिासांनी विविध कलमानुसार संशयित भटजीला अटक केली आहे.
शशांक जोशी (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या संशयित भटजीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेसोबत २०२० मध्ये संशयित भटजीची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर जोशी याने पीडित महिलेस सतत फोन करू लागला. पीडित महिलेसोबत बोलणे वाढवून एक दिवस संशयित आरोपी जोशी आणि पीडित महिला खुबी येथील धरणाच्या रस्त्याच्या बंधाऱ्यावर असताना तिथे पीडितेसोबत त्याने फोटो काढले होते.
बळजबरीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले
यानंतर हळूहळू एकत्रित भेटून वेळोवेळी काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी पीडितेला दिली. डिसेंबर २०२० मध्ये आरोपीने महिलेच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. यानंतर या बद्दल कोणाला काही सांगितल्यास जीवाचे बरे वाईट करेल अशी धमकी देखील दिली. असे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तसेच आरोपीने फिर्यादी यांची आई, बहिण आणि भाऊ यांना देखील फोन करून त्रास दिला. पीडितेच्या नवऱ्याच्या मित्राला फोटो पाठवले. या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने ओतूर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास ओतूर पोलीस हे करीत आहेत.