इंदापूरः तालुक्यातील एका गावात अज्ञात कारणावरुन एका ३३ वर्षीय महिलेवर सपासप वारु करुन खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुनिता दादाराम शेंडे असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव असून या प्रकरणी इंदारपूर पोलिसांनी ज्ञानेश्वर बबन रासकर रा.सुरवड ता. इंदापूर जि पुणे या संशयित आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ४ डिसेंबर रोजी रात्री ८ ते साडेआठ वाजण्यच्या सुमारास निमगाव केतकी सराफवाडी रस्त्यावरील अजिनाथ मोरे यांच्या पत्राच्या शेडजवळ घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तसेच या घटनेनंतर संशयित आरोपी ज्ञानेश्वर बबन रासकर हा स्वःताह इंदापूर पोलिसांत हजर झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४ डिसेंबरच्या साधारण ८ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास निमगाव केतकी सराफवाडी रस्त्यावरील अजिनाथ मोरे यांच्या पत्राच्या शेडजवळ अज्ञात कारणावरुन सुनिता यांच्यावर आरोपी ज्ञानेश्वर याने हल्ला चढवित त्यांच्या डोक्यात, पोटावर, छातीवर आणि हातावर चाकूने सपासप वार करुन निर्घूनपणे खून केला. या घटनेत सुनिता यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार गावडे हे करीत आहेत.