मध्यप्रदेशः तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करत आहात, मग ती कोणत्याही क्षेत्रातील असुद्या तुमच्या बॅासने वा मालकाने तुमचा पगारात वाढ केली नाही तर तुम्ही फार तर रागावाल किंवा मग एक दोन दिवस कामावर येणार नाही. पण मध्यप्रदेश राज्यातील बैतोर शहरातील एका शॅापिंग मॅालमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा पगार मालकाने वाढवला नाही याचा राग मनात धरुन कामगाराने मालकाला १८ लाखांचा चुना लावण्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पोलिसांनी संबंधित कामगाराला अटक केली आहे. सदर घटना २ नोव्हेंबर रोजी घडली असून, मॅालमधील एका इलेक्ट्रॅानिक दुकानात काम करणाऱ्या कामगाराने दुकानातील एलएडी टीव्ही आणि फ्रीजचे नुकसान केले आहे. ही संपूर्ण घटना दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
अशी घडली घटना
उत्तरप्रदेश राज्यातील बैतोर शहर भागातील गंज भागात एक गुप्ता नावाचे शॅापिंग मॅाल आहे. या शॅापिंग मॅालमध्ये एक इलेक्ट्रॅानिक दुकान आहे. या दुकानात मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॅानिक वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. याच दुकानात कमल पवार हा कामगार नोकरीला होता. मालकाकडे कमलने पगारात वाढ व्हावी म्हणून मागणी केली होती. मात्र, मालकाने त्याच्या पगारात वाढ केली नाही. याच राग कमलला अनावर झाला आणि त्याने दुकानातील ११ एलएडी टीव्ही आणि ७१ फ्रीजला त्याच्या हातातील कड्याच्या साह्याने नुकसान पोहचवले आहे. ज्या दिवशी पगारात वाढ होणार नाही, असे मालकाने सांगितल्याने ३ दिवस कमल कामावर आला नाही. चौथ्या दिवशी कामावर आल्यानंतर कमलच्या मनात राग होता. हा राग अनावार झाल्याने त्याने दुकानातील एलएडी टीव्ही आणि फ्रीजचे नुकसान केले आहे. यामुळे मालकाला १८ लाखांचा तोटा झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.