जेजुरीः पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघात मुख्य लढत असलेल्या तिन्ही उमेदवारांसाठी ही निवडणूक अटीतटीची झाली आहे. तिन्ही उमेदवारांचे अनुक्रमे जगताप, शिवतारे आणि झेंडे यांचे पारडे जड असल्याने यांच्यात कोण सरस ठरणार याची उत्सुकता आता शिगेला पोहचलेली आहे. एक्सिट पोलनुसार तिन्ही उमेदवारांची नावे आमदाराकीसाठी घेतली जात आहे. मात्र, यापैकी एकालाच संधी मिळणार असून, फार थोड्या मताने येथील विजयी उमेदवार निवडून येईल, अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुरंदर-हवेली मतदार संघात हवेली हा मतदार संघ गेम चेंजर ठरू शकतो. याचे कारण म्हणजे जो उमदेवार येथून लीड घेईल तोच उमेदवार विजयाचा दावेदार असल्याचे आजपर्यंतच्या निकालाने दाखवून दिले आहे.
तिन्ही उमेदवारांबद्दल संमिश्र प्रतिक्रिया
या विधानसभेतील चित्र कुणा एकाच्या पारड्यात प्लस आणि दुसऱ्याच्या पारड्यात मायन्स असे नसून, मतदार संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. विजय कोणाचा होणार हे सांगणे जरा कठीण बनले आहे. यामुळे विजयाच्या रेसमध्ये तिन्ही उमेवारांची नावे घेतली जात आहेत.
हवेलीतून मुसंडी मिळणे गरजेचे
पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघाचा आजवरचा इतिहास पाहिला तर हवेली भागातून ज्या उमेवाराला मोठे लीड मिळते. तोच उमेदवार येथून निवडून येतो. यामुळे जगताप, शिवतारे आणि झेंडे यापैकी जो उमेदवार येथून लीड घेईल तोच पुरंदरचा आमदार होईल.