Thursday, June 25, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

प्रचारदौराः अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधवांनी कार्यकर्त्यांसह मारला झणझणीत खर्ड्यावर ताव; आगळीवेगळी प्रचार यंत्रणा राबवून जाधव साधताहेत मतदारांशी संवाद

by SBPRNL
November 13, 2024
प्रचारदौराः अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधवांनी कार्यकर्त्यांसह मारला झणझणीत खर्ड्यावर ताव; आगळीवेगळी प्रचार यंत्रणा राबवून जाधव साधताहेत मतदारांशी संवाद

वाईः राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, सर्वच पक्षातील उमेदवारांनी आपापल्या मतदार संघात जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. या काळात अनेकदा विधानसभा क्षेत्रातील गावोगावी जात नागरिंकाशी संवाद साधला जातो. त्यांना मतदान करण्यासाठी आवाहन केले जाते.

या प्रचारात अनेक उमेदवारांच्या गाड्यांचा भलामोठा ताफा आपल्याला दिसतो. मात्र, वाई विधानसभेचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी अत्यंत साध्य पद्धतीने प्रचार यंत्रणा राबविली असून, अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न केला आहे. सकाळी ८ वाजल्यापासून जाधव हे प्रचाराला सुरूवात करीत असून, त्यांच्या गावभेट दौऱ्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

You might also like

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

आज दि. १३ नोव्हेंबर रोजी जाधव यांनी वाई येथील पूर्व भागातील गावात प्रचार सुरू असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरातूनच आणलेल्या भाकरी कांदा, चटणी व मिरचीच्या झणझणीत खर्ड्यावर त्यांना ताव मारून पुढच्या प्रचाराला आगेकूच केली. वाई पूर्व भागात पुरुषोत्तम जाधव यांना गावोगावी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मतदारांच्या व्यथा ते प्रत्यक्ष पारावर गप्पा मारून समाजावून घेत आहेत. अवास्तव खर्चाला फाटा देऊन पुरुषोत्तम जाधव यांनी सुरू केलेली आगळीवेगळी प्रचार यंत्रणा म्हणजे भांडवलदारासमोर सामान्य कुटुंबातील व्यक्ती अशी ही लढाई पाहायला मिळणार असल्याची चर्चा या विधानसभा क्षेत्रात करण्यात आली आहे.

संधी द्यायला काय हरकत आहे

अपक्ष उमदेवार असलेले पुरषोत्तम जाधव हे मूळातच एका सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांचा साधेपणा तसेच सर्वांशी मिळून मिसळून बोलण्याची पद्धत कोणालाही काही अडचण असल्यास त्याची सोडवणूक करण्याची त्यांची वृत्ती ही मतदारांना भावत असून, जाधव यांना एकवेळ नक्तीच संधी दिली पाहिजे असे येथील मतदार म्हणत आहेत.

Tags: purushuttamjadhavrajgadnewssatarawai
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Next Post
वाई विधानसभाः दूरदृष्टी असलेले नेतृत्व आपण सर्वांनी मिळून विधानसभेत पाठवायला हवेः सायली कोंढाळकर यांचे महाबळेश्वरकरांना आवाहन

वाई विधानसभाः दूरदृष्टी असलेले नेतृत्व आपण सर्वांनी मिळून विधानसभेत पाठवायला हवेः सायली कोंढाळकर यांचे महाबळेश्वरकरांना आवाहन

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group