पुणेः खेड शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटीची रोख रक्कम सापडल्यानंतर सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती. एवढी मोठी रक्कम ज्या कारमधून राजगड पोलिसांनी हस्तगत केली होती. ती कार पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणावर पोलीस काही ठोस माहिती देत नसल्याची बाब उघड झाली. पोलीस या प्रकरणी काहीच स्पष्ट बोलत नाहीत. तसेच त्या कारमधील चारजणांवर गुन्हे दाखल करण्यात न आल्याने चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांनी या कारमधून ४ व्यक्तींची नावे जाहीर केली असली, तरी गुन्हाची नोंद का करण्यात येत नाही, असा प्रश्न सगळ्यांच पडला होता. तसेच ही कार सांगोल्याच्या दिशेने जात असल्याची चर्चा करण्यात येत आहे. आता या प्रकरणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
‘ती’ कार मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने
५०० रुपयांची चलनी नोटा असे एकूण ५ कोटीची रोख रक्कम कारवाईमध्ये आयकार विभाग देखत हस्तगत करण्यात आली आहे. ही रक्कम आम्ही आयकर विभागाला हस्तांतरीत केलेली आहे. तसेच या कारमधील व्यावसायिकांनी त्यांची ही रक्कम असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या वतीने त्याबाबतचे पुरावे ते आयकर विभागाला देत आहेत. अशा प्रकारे १० लाखांच्या वर रोख रक्कम आढळली तर गाईडलाईननुसार आम्हाला संबंधित विभागाला कळवणे अभिप्रेत असते. त्यानुसार आम्ही आयकर विभागांच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन घटनास्थळी बोलावले होते. मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने ही कार जात असल्याचे यातील व्यावसायिक व्यक्तीने सांगितले असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.