नसरापूर : राजगड पोलिस स्टेशनच्या हद्दीत शेटे आळी, नसरापुर येथे एका ३२ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मृत व्यक्तीचे नाव राजेंद्र सुरेश हाडके असे आहे.
राजेंद्र यांची पत्नी कोमल राजेंद्र हाडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ४:३० वाजता भाजीपाला खरेदीसाठी बाजारात गेल्या होत्या. त्या घरी परत आल्या तेव्हा त्यांना त्यांचा पती राजेंद्र राहत्या घराच्या तुळईच्या पाईपला नायलॉन दोरीने गळफास घेऊन मृत अवस्थेत दिसला. त्यांनी ताबडतोब शेजारी पाजारी यांना आणि पोलीस स्टेशनला माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला. तपास अधिकारी पो.ना. कोंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. मृतदेहाचे शवविच्छेदन भोर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.