कलानगरीः सिनेमा इंडस्ट्रीत जुने पिक्चर पुन्हा रिरिलीज करण्यात येत असल्याचे पाहिले आहे. मात्र, असा एक पिक्चर जो तब्बल २० वर्षांनी रिलीज करण्यात आलाय. त्या पिक्चर नाव नाम असून, अभिनेता अजय देवगण या पिक्चरमध्ये मुख्य भूमिकेत आहे. हा पिक्चर २००४ मध्ये बनवून तयार करण्यात आला होता. त्यावेळी पिक्चर अनेक कारणांमुळे रिलीजसाठी पुढे ढकल्यात आला होता. असे बऱ्याच वेळा झाल्याने अखेर पिक्चरचे दिग्ददर्शक अनिज बझमी यांनी नामला रिलीज न करण्याचे ठरवले. आता २०२४ मध्ये नाम रिलीज झालाय. असं काय घडलं होतं की नाम पिक्चर रिलीज व्हायला ऐवढा वेळा गेला.
मूळातच २००४ मध्ये एक क्राईम थ्रीलर पिक्चर बनवन मोठं आव्हान होतं. त्याकाळात अनिझ बझमी ज्यांनी वेलकम, भुलभुलैय्या सारखे पिक्चर केल आहेत. त्यांनी नाम पिक्चर त्या काळात तयार केला. रिलजसाठी पिक्चर तयार असताना पिक्चरच्या एका निर्मात्याचा मृत्यू झाला. यानंतर नाम पिक्चर एका बाजूला पडला आणि त्यानंतर अनेकांनी रिलीज करण्याचे ठरवले पण ती गोष्ट काही कारणांमुळे शक्य झाली नाही. नंतर २०१४ मध्ये हा पिक्चर रिलीज करण्याचे ठरले होते. पण त्यावेळी देखील गाडं आडलं आणि नाम हा नामच राहिला. अशी देखील बातमी आहे. नाममध्ये क्राईम थ्रीलर असून, एक व्यक्ती जो आपली ओळख विसरला आहे. त्याची भोवतीने कथानक फिरत राहत. आणि पिक्चरचा शेवट आश्चर्यकारक आहे. असो असेही होऊ शकते की एखादा पिक्चर तब्बल २० वर्षांनी रिरिलीज नव्हे तर रिलीज होत आहे.