वाई प्रतिनिधी: सुशील कांबळे
वाई : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अध्यक्षपदी उद्योजक उदय पोळ पाटील यांची एकमतानी बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल त्यांचा आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आ.पाटील यांनी प्राथमिक शाळेत सर्वतोपरी सहकार्य करण्याची अभिवचन देऊन पोळ यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
त्याप्रसंगी कवठे गावचे सरपंच, उपसरपंच तसेच कवठे ग्रामस्थ उपस्थित होते..