वाई प्रतिनिधी : सुशील कांबळे
वाई : वाई तालुक्यातील अनेक घटनांचा साक्षीदार असलेल्या जुन्या ब्रिटिशकालीन पूल पाडून त्याठिकाणी नवीन पुल अवघ्या सहा महिन्यात उभारण्यात आला.दळणवळणासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या याचं पुलाला किसन वीर चौकात माञ जुन्या संरक्षक भिंतीवर मोठया प्रमाणात झाडेझुडपे वाढली असुन यामुळे या भिंतीला तडे गेल्याने भिंत धोकादायक बनली आहे.
वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर भिंत कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. कृष्णानदीवरील नवीन पूल वाईवाईकरांसाठी तसेच पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय असणाऱ्या या पुलामुळे सततच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून वाईकरांना कायमची मुक्ती मिळाली आहे. परंतु, किसन वीर चौक ते नवीन पुलापर्यंत असणारी जुन्या संरक्षक भिंतीला झाडाझुडपांनी वेढल्यामुळे धोका निर्माण झाला आहे.संरक्षक भिंतीवर विविध प्रकारच्या झाडांचे साम्राज्य निर्माण झाल्याने संपूर्ण कठडा धोक्यात आला आहे.
भिंतीवर झाडे झुडपे उगविल्याने भिंतीला तडे जाऊन भेगा पडल्यास अनर्थ घडू शकतो. संबंधितांनी याकडे त्वरित लक्ष घालून झुडपं काढण्याची गरज आहे. वाई पालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन भिंतीवर वाढलेली झाडे त्वरित हटवून संरक्षक कठडा झुडपेमुक्त करावा,अशी मागणी वाईकरांमधून करण्यात येत आहे.
वाईच्या वैभवात भर घालणाऱ्या कृष्णा नदीवरील नवीन पुलामुळे नागरिकांची सुविधा झालीआहे. परंतु, त्याच्या संरक्षक संरक्षक कठड्यासाला धोका कठड्यावर उगवलेल्या झुडपांमुळे संभवतो. त्यामुळे पालिका प्रशासनाने त्वरित लक्ष घालून संरक्षक कठडा झुडपेमुक्त करावा. – संजय गायकवाड,मनसे तालुका अध्यक्ष