इंदापूरः सचिन आरडे
इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (ISTE) च्या अंतर्गत विद्या प्रतिष्ठान इंदापूर पॉलिटेक्निक कॉलेज ISTE स्टुडन्ट चाप्टर ( MH 323 )च्या विद्यमाने ” VIDYA TECHFEST -2K24″ या राज्यस्तरीय तांत्रिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी ISTE, नवी दिल्लीचे चेअरमन डॉ. प्रतापसिंह देसाई , तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन माजी संचालक, डॉ. एन. बी. पासलकर तसेच बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार हे उपस्थित होते. या स्पर्धेचे उदघाटन डॉ. प्रतापसिंह देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
विविध स्पर्धांचे आयोजन
या निमित्ताने महाविद्यालयात विविध तांत्रिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ऑटोमोबाईल अभियांत्रिकी विभागातर्फे पेपर सादरीकरण स्पर्धा, सिव्हिल अभियांत्रिकी विभागातर्फे ब्रिज मॉडेल बनवणे स्पर्धा, संगणक अभियांत्रिकी विभागातर्फे ब्लाइंड सी स्पर्धा, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार विभागातर्फे पोस्टर सादरीकरण स्पर्धा, यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातर्फे कॅड वॉर स्पर्धा या स्पर्धेत इंदापूर परिसरातील एकूण १२ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.
८६३ विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग
विद्या प्रतिष्ठान कमल नयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग, बारामती, एसव्हीपीएम अभियांत्रिकी महाविद्यालय, एसव्हीपीएम इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, मालेगाव, शरद चंद्रजी पवार अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पॉलिटेक्निक, सोमेश्वर, फलटण कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, KVPs पॉलिटेक्निक कॉलेज कळंब, दत्तकला अभियांत्रिकी महाविद्यालय, भिगवण,एसबीपी अभियांत्रिकी महाविद्यालय, इंदापूर, सहकार महर्षी कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक अँड इंजिनीअरिंग, अकलूज ,श्रीराम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (पॉली), पानीव, SVERIs कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पंढरपूर व विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर या महाविद्यालयातील एकूण ८६३ विद्यार्थांनी सहभाग नोंदविला. या तांत्रिक स्पर्धेत ऑटोमोबाईल विभागात अंजली देवकाते विजेती तर साक्षी सूर्यवंशी उपविजेती ठरली.
VPCSC इंदापूर संगणक विभाग, पिसे अनुष्का ,VPP ,इंदापूर ,(विजेती ), खरात धनश्री , पाणीव , उपविजेती , इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकॉम्म्युनिकेशन विभाग , ऋतुराज गायकवाड , SIET , पाणीव ( विजेता ) , देवकर ओम , VPP , इंदापूर ( उपविजेता ), सिव्हिल विभाग , नसले किशोरी आणि सिद यशश्री ,SIET , पाणीव ( विजेता ) , शिंदे किरण , बी पी पी कळंब ( उपविजेता ), यांत्रिकी विभाग ,मजगे राज , VPP ,इंदापूर ,(विजेता ),वडगणे कौस्थुभ ,VPP ,इंदापूर ,(उप विजेता )यांनी बक्षिसे पटकावली.
विजेत्यांना एकूण रोख रक्कम रुपये १०००/- तसेच ट्रॉफी, टी-शर्ट व प्रमाणपत्र, उपविजेत्यांना एकूण रोख रक्कम रुपये ५००/- तसेच ट्रॉफी, टी-शर्ट व प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व सहभागी विद्यार्थांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले. डॉ. एन बी पासलकर यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी सर्वेक्षक, भूमी अभिलेख उपअधीक्षक आणि महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक केदारनाथ शिंदे, तांत्रिक लीड, गूगल इंडिया आणि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी राहुल मखरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. एन बी पासलकर यांनी विद्या प्रतिष्ठान पॉलीटेक्नीक महाविद्यालशी खुप जवळचे नाते असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सोनाली काळे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षक विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता महाविद्यालातीत सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षेकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमास ए एस के सॉफ्टवेअर टेकनॉलॉजियेसी, एक्ससिल्लेन्ट, शुभ्रा केबल्स, इन्फो ऑटोटेक इंडिया, कोठारी हार्डवेअर अँड इलेक्ट्रॉनिक्स आदीची स्पॉन्सरशिप मिळाली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ISTE स्टुडन्ट चॅप्टर MH323 चे अध्य्क्ष प्रा. सोमनाथ चिकणे, यांनी मानले. यावेळी यांत्रिकी विभाग तर्फे ऍप्टिट्यूड टेस्ट घेण्यात आली. यामध्ये विजेता पद सातपुते सुशांत बाळासाहेब याने तर
उपविजेते पद व्यवहारे सिद्धी राहुल हिने पटकाविले. सर्व विजेत्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख व प्राध्यापक वर्गाकडून अभिनंदन करण्यात आले.