पारगांवः धनाजी ताकवणे
दौंड विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल कुल आणि रमेश थोरात यांच्यातच पुन्हा एकदा आमनेसामने सामना रंगणार आहे. दौंडमध्ये महायुतीत फूट पडली असून, माजी आमदार रमेश थोरात यांनी अजित पवार पक्षाला रामराम करून शरद पवार गटात प्रवेश करुन तुतारी चिन्हावर लढणार असल्याचे निश्चित झाले.
सोमवार दि.२८ अॅाक्टोबर रोजी असंख्य कार्यकर्ते व समर्थकांच्या उपस्थितीत रमेश थोरातांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
मागील लोकसभा निवडणुकांच्यावेळी शरद पवार गट आणि अजित पवार गट हे विभक्त झाले होते. यावेळी अजित पवार यांचे खंदे निष्ठावंत समर्थक मा. आमदार रमेश थोरात यांनी अजित पवार यांच्या बाजूने राहण्याचा ठाम निश्चय घेत लोकसभेवेळी महायुतीमध्ये प्रवेश केला होता. तसेच ते अजित पवार गटामध्ये समील झाले होते. त्यांनी सुनेत्रा पवार यांचा एकत्रित प्रचार करताना सर्व तालुक्यांना पाहिले आहे.
राहुल कुल यांनी लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा लोकसभेच्या निवडणुकीत एकत्रित प्रचाराचे काम केले आहे. भाजपकडून राहुल कुल यांच्या तालुक्यातील चांगल्या कामगिरीमुळे त्यांना भाजप महायुतीकडून पुन्हा एकदा दौंड विधानसभा निवडणुकीसाठी पसंती देण्यात आली.
शेवटी गेली महिनाभर रंगलेल्या तू तू मे मे चर्चेला आता पूर्णविराम मिळत, राष्ट्रवादी शरद पवार गटातील इच्छुकांची अखेर रमेश थोरात यांना पाठिंबा दिल्याने रमेश थोरात यांचा तुतारी चिन्हावर लढण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. दौंड तालुक्यातील गेले दोन महिने चाललेल्या शक्तिप्रदर्शन आणि चल बिचल राजकीय घडामोडींना मतदारांनी सुद्धा चांगलाच आनंद घेतला आहे.आता कोण बाजी मारणार याची संपूर्ण दौंड तालुक्याला चर्चा रंगली असून, उत्सुकता निर्माण झाली आहे.