बस कोसळली ६० फूट खोल दरीत ,
प्रतिनिधी – कुंदन झांजले
भोर: भोर पोलीस स्टेशन हद्दीतील वरंधा घाटात शिरगावजवळ रविवारी (दि.८) मध्यरात्री अडीचच्या सुमारास १७ सिटर टेम्पो ट्रॅव्हल्स मिनी बस गाडी नंबर MH-08 -AP1530 स्वारगेट ते चिपळूण १० व्यक्तींना घेऊन स्वारगेट- भोर- महाड मार्गे चिपळूणकडे जात असताना ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हि मिनीबस रोड सोडून ५० ते ६० फूट खोलदरीमध्ये कोसळल्याची घटना घडली.
अपघाताची माहिती मिळताच घटना स्थळी भोर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील आपल्या सहका-यांसह , रेस्क्यु टीमसह घटनास्थळी दाखल झाले सदर अपघातामधील सर्व व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात असुन कोणतीही जीवितहानी झाली नाही सदर अपघातातील तीन ते चार जखमी प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालय भोर या ठिकाणी उपचार कामी पाठवण्यात आले आहे . भोरमधील रेस्क्यू टिम, भोर पोलीस स्टेशन कडील स्टाफ व शिरगाव येथील स्थानिकांसह पोलीस मित्र यांनी सदर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले अशी माहिती भोरचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली
अपघाताची माहिती मिळताच घटना स्थळी भोर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील आपल्या सहका-यांसह , रेस्क्यु टीमसह घटनास्थळी दाखल झाले सदर अपघातामधील सर्व व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात असुन कोणतीही जीवितहानी झाली नाही सदर अपघातातील तीन ते चार जखमी प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालय भोर या ठिकाणी उपचार कामी पाठवण्यात आले आहे . भोरमधील रेस्क्यू टिम, भोर पोलीस स्टेशन कडील स्टाफ व शिरगाव येथील स्थानिकांसह पोलीस मित्र यांनी सदर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले अशी माहिती भोरचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली.