पारगांव: धनाजी ताकवणे
नानगाव (ता. दौंड) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शितल सचिन शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मक्तेदार यांनी दिली. या निवड प्रक्रियेवेळी ग्रामपंचायत अधिकारी किशोर बनकर, गाव कामगार तलाठी मिलिंद अडसुळे या वेळी उपस्थित होते.
माजी सरपंच स्वप्नाली शेलार यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त सरपंचपदासाठी शुक्रवारी (दि. ८) निवडणूक प्रक्रिया पार पडली. या वेळी शिंदे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सदस्य अॅड. अशोकराव खळदकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस विकास खळदकर, भीमा-पाटसचे संचालक आबासाहेब खळदकर, माजी सरपंच स्वप्नाली शेलार, उपसरपंच सचिन शेलार, माजी उपसरपंच संदीप खळदकर, गणेश खराडे, सदस्य विष्णू खराडे, स्वाती आढागळे, कर्मचारी मारुती गायकवाड, मच्छिंद आढागळे ग्रामस्थ आदी उपस्थित होते.