नागपूरः आज दुपारी चार वाजता मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असून महायुतीमधील एकूण ४० आमदार मंत्रपदाची शपथ घेण्यात येणार आहे. राज्याची उपराजधानी नागपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहे. त्यांची विजयी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. फडणवीस यांच्या सोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत. फडणवीस हे नागपूर विमानतळावर दाखल होताच त्यांनी आजचा दिवस खूप आनंदाचा असल्याचे सांगत विरोधकांवर टीकास्त्र डागले. यावेळी ते म्हणाले डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान नाकारणारे हे लोक आहेत.
भाजपकडून २० मंत्री मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये नव्या जुन्या आमदारांचा मेळ घालत भाजपकडून शपथ घेणाऱ्या आमदारांना स्वःताह मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले असल्याचे समजते. फडणवीस यांच्या रॅलीला मोठा प्रतिसाद नागपूरकरांनी दिला असून फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. या स्वागत रॅलीत मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणींचा सहभाग दिसत आहे. मोठ्या संख्येने नागपूरकर या स्वागत रॅलीत सहभागी झाले आहेत.