उत्तरप्रदेशः प्रवास करताना एखादे ठिकाण सापडत नसले तर आपण गुगल मॅपचा आधार घेतो. गुगल मॅपवर लोकशन केल्यानंतर मॅप आपल्याला दिशादर्शकाच्या साह्याने इच्छित स्थळी पोहचवतो. पण कधीकधी हाच गुगल मॅप चकवा देतो. मात्र हाच गुगल मॅपचा चकला उत्तरप्रदेशातील तीन तरुणांचा जीव जाण्याचे कारण ठरला आहे. तीन मित्र एका कारमधून बरेलीहून हरियाणाच्या दिशेने जात होते. मात्र त्यांच्या कारचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये तिन्ही मित्र आपल्या जीवाला मुकले. हे असं का झालं याचाच हा आढावा…
दि. २४ नोव्हेंबर या दिवशी तीन मित्र अमित सिंग, विवेक चौहान आणि त्याचा भाऊ नितीन हे तिघे उत्तरप्रदेशमधील बरेलीहून हरियाणाच्या दिशेने कारमधून चालले होते. बधाईपर्यंत त्यांची कार आली त्यानंतर रस्ता अचूक मिळण्यासाठी त्यांच्यातील एकाने गुगल मॅपचा आाधार घेतला. दिशा दाखवल्याप्रमाणे त्यांची गाडी रस्त्यावरून धावत होती. रस्त्यात एक पूल आला त्यापूलावरून त्यांनी कार घेतली. पुढे गेल्यावर कार पूलावरून नदीत कोसळली आणि या तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
4 इंजिनिअर विरोधात गुन्हा
मूळात या पूलाचा अर्धा भाग रामसंगमावर असलेल्या पूरात वाहून गेला होता. मॅपने दिशा दाखवल्याप्रमाणे त्यांची कार यापूलावरून गेली. मात्र, पूर मध्येच अर्धाअवस्थेत असलेल्या त्यांची कार पूलावरून नदीत कोसळली. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तिन्ही तरुणांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या ४ इंजिनिअर विरोधात बरेली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गुगल मॅपला मागितले स्पष्टीकरण
तसेच गुगलकडून देखील स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. पूलाचा अर्धा हिसा नदीत वाहून गेल्याने त्याची अपडेशन मॅपमध्ये होणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्याने पुढे कोणताही धोका नसल्याचे प्रवाशांना वाटले. तसेच या ठिकाणी कोणत्याही प्रकाराचे दिशादर्शक फलक लावण्यात आले होते. पूल ज्या ठिकाणी तुटलेला आहे. त्या शेवटच्या ठिकाणी बॅरेगेटिंग करण्यात आली नव्हती. जर या गोष्टी ज्याने त्याने त्यांच्या पातळीवर पूर्ण केल्या असत्या तर या तीन प्रवाशांचा जीव वाचला असता.