पुणेः मंत्रीमंडळाचा विस्तार पूर्ण झाला असून उद्या दि. १४ डिसेंबर रोजी मंत्र्याचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार असल्याची माहिती विश्वनीय सूत्रांनी दिली आहे. खातेवाटपात शिवसेनेकडून गृह खात्यावर दावा करण्यात आला होता. मात्र, भाजपने गृहखाते स्वःताकडे ठेऊन त्याबदल्यात शिवसेनेला नगरविकास खाते देऊ केले आहे. पूर्वी हे खाते शिवसेनेकडेच होते. परत एकदा नगरविकास खाते शिवसेनेच्या पदरात पडले असल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच मंत्र्यांची नावावर अंतिम शिक्का मोर्तेब झाला असून ही नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. याचे कारण म्हणजे तिन्ही पक्षातील अनेकजण मंत्रीपदासाठी इच्छुक होते. आता कोणाच्या पदरात कोणते मंत्रीपद पडणार आणि कोण मंत्री होणार यासाठी उद्याची वाट पाहावी लागणार आहे.शिवसेनेने अनेक खात्यांवर दावा केला होता. मात्र, बहुंताशी मोठी खाते भाजपने आपल्याकडे ठेवली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पर्यावरण खात्याऐवजी शिवसेनेला पर्यटन खाते देण्यात येणार आहे. असा बद्दल करण्यात आला आहे. आता मुद्दा असा आहे की पूर्वीचीच खाती सेनेला मिळणार की मोठा बदल होणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.