जेजुरीः पुरंदर विधानसभेसाठी आज दि. २३ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया सासवड येथील नवीन शासकीय इमारतीमध्ये संपन्न झाली. या निवडणुकीत प्रामुख्याने तीन उमेदवारांमध्ये मुख्य लढत होती. या लढतीत महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांनी बाजी मारली असून, विजय शिवतारे यांनी विजयाचे मैदान मारले आहे. यामुळे पुरंदर विधानसभेवर शिवतारे यांनी २०१९ चा अपवाद वगळता तिसऱ्यांदा भगवा फडकविण्यात यश आले आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच शिवतारे हे आघाडीवर होते. काही ठिकाणी त्यांच्या लीडमध्ये फरक पडला. मात्र, पहिल्या २० फेऱ्यांमध्ये त्यांनी २२ हजारांचे लीड घेतले होते. त्यांच्या विजयामुळे संजय जगताप यांना पराभवाचा सामाना करावा लागला आहे. काँग्रेसची जागा शिवसेना( शिंदे) गटाला मिळाली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून विजय शिवतारे यांनी २०१९ च्या निवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढल्याचे पाहिला मिळत आहे.
कार्यकर्त्यांकडून जल्लोष
शिवतारे यांना पहिल्या फेरीपासूनच सतत मिळाणाऱ्या आघाडीमुळे त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत विजयोत्सव साजरा केला. सासवड शहर आणि तालुक्यात शिवतारे यांचे समर्थक एकटले असून फटक्यांची आतिषाबाजी करीत जल्लोष साजरा केला जात आहे.
202-पुरंदर-हवेली मतदार संघ
एकूण 30 फेऱ्या
- विजय शिवतारे : शिवसेना :125819
- संजय जगताप : कॉंग्रेस : 101631
- संभाजी झेंडे: राष्ट्रवादी काँग्रेस : 4719
- विजय शिवतारे 24188 मतांनी विजयी