काँग्रेस पदाधिकाऱ्याचा राष्ट्रवादीला पाठिंबा तर भरघोस मतदान करण्याचे आवाहन. भोर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
भोर – अनेक वर्षांपासून शरद पवार सांगत होते व्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येकाला मिळाल पाहिजे,आपण संविधानाच्या गोष्टी सांगतो लोकशाही म्हणतो.मग जर लोकशाही असेलं आणि अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून बरोबर असणारी ८० टक्के लोक सोबत आली असतील तर पक्ष चोरला किंवा चोरून नेला असं होऊ शकत? आपण लोकशाहीच्या गप्पा मारतो मग लोकशाही नक्की कशाला म्हणायचं? असा प्रश्न बारामती हायटेक टेक स्टाईलच्या अध्यक्ष सुनेञा पवार यांनी उपस्थित केला.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे,माजी जि.प उपाध्यक्ष रणजीत शिवतरे,युवा नेते विक्रम खुटवड,माजी जि.प सदस्य चंद्रकांत बाठे,जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमोल पांगारे,भाजपाचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे,बाळासाहेब गरुड, विद्याताई पांगारे, नीलम झांजले,अर्जुनराव अहिरे,गणेश निगडे,महेंद्र भोरडे , काँग्रेसचे के डी सोनवणे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सारोळा येथील छञपती शिवाजीमहाराजांच्या पुतुळयाला पुष्पहार घालुन गाव भेट दौऱ्याला सुरवात झाली यावेळी सारोळा सावरदरे पांडे,राजापुर,भोंगवली,भांबवडे,न्हावी १५,पेंजळवाडी,गुणंद,न्हावी ३२२, वाठारहिंगे, टापरेवाडी या गावात दौरा केला यावेळी बोलताना सुनेञा पवार म्हणाल्या संविधानाने प्रत्येकाला विचार स्वतंत्र्याचा अधिकार दिला आहे..मग अजित पवारांनी त्यांची भूमिका बदलली त्यांचा विचार वेगळा असेलं तर ते चुक कसं असू शकेल. लोकं सुज्ञ आहेत, त्यामुळे नक्की खरं कायं आणि खोट कायं हे लोकांना समजेल. विकास करायचा असेलं तर सरकारमध्ये असण गरजेचं आहे, म्हणून अजित पवारांनी ही भूमिका घेतल्याचं सुनेत्रा पवार म्हणाल्या. महायुतीतील इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील विकासकामाबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पक्षीय राजकारणा पलिकडचे, व्यापक हिताचे अनुभव सांगितले. जनतेला २४ तास भेटणारे दादा आहेत, कधीही फोन केला तर त्याला प्रतिसाद देणारे दादा आहेत, आपण सारे जण दादांचे भाऊ आहोत, श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कृष्णच. अशा अनेक भावना सर्वांकडून पोटतिडकीने व्यक्त होत होत्या. त्या भावनातून लोकसभा निवडणुकीतील विजयाचा निर्धार व्यक्त केला. यावेळी त्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची दखल मी घेतली असून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी कोणतीही कसूर ठेवणार नाही. ज्या ठिकाणी ही सदिच्छा भेट झाली ते ठिकाण पाहून मला माझ्या आजोळची आठवण झाली. त्या अर्थाने आजोळातून मिळणारे प्रेम मला पूर्व भागातून मिळणार याची खात्री येथील एकजुटीने मिळाली.
भोर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीला पाठिंबा तर भरघोस मतदान करण्याचे आवाहन.
भोर तालुका काँग्रेसचे मा.तालुका अध्यक्ष व राजगड सहकारी कारखान्याचे व्हा.चेरमन के. डी सोनवणे यांचा सुनेत्रा पवार यांना व राष्ट्रवादी पक्षाला जाहीर पाठिंबा जाहीर केला सुनेत्रा पवार यांचा प्रचार दौरा न्हावी या ठिकाणी असताना प्रचार दौऱ्यात ते बोलत होते पुढे ते म्हणाले की, अजित पवारांचे काम चांगले असून आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.म्हणून आपण सर्वांनी भरगोस मतधीक्यानी राष्ट्रवादीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. तसेच उपस्थित उमेदवार व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या गावातून प्रचंड मतदान देण्याची ग्वाही दिली. एकीकडे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे हे सुप्रिया सुळे म्हणजेच शरद पवार यांच्या गटाला पाठिंबा देण्याची भूमिका स्पष्ट करतात परंतु त्यांच्याच पक्षातील काँग्रेस पदाधिकारी व विद्यमान संचालक याचा राष्ट्रवादी पक्षाला दिलेला पाठिंबा यामुळे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या भोर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.