राजगड न्युज नेटवर्क
खंडाळा : केसूर्डी (ता.खंडाळा) येथील नामांकित कंपनीतील सुमारे १९ लाख०७ हजार ४४३ रुपये किमतीचा रंगाचे डबे घेऊन जाणारे गाडी व मुद्देमाल चोरीस गेला असून संशयित गणेश गायकवाड यांच्या विरोधात शिरवळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,केसुर्डी ता. खंडाळा गावचे हदीतून एशीएन पेन्ट्स कंपनी केसुर्डी येथून कंपनी मधुम रंगाचे डबे सुमारे सुमारे १९ लाख०७ हजार ४४३ रुपये किमतीचा रंगाचे डबे भरून लॉजीस्टीक पार्क सर्वे नं. 3321 व्ही. निमजी कलमेश्वर ता. निमजी जि.नागपुर येथे 14 टायर गाडीचा क्र. MH 18 BZ9624 वा किन्नर गणेश गायकवाड याने विश्वास संपादन करून सदर माल लॉजीस्टीक पार्क सर्वे नं. 332/1 निमजी कलमेश्वर ता. निमजी जि नागपुर येथे पोहच करण्यासाठी विश्वासाने जबाबदारी सोपवली होती त्याचाच फायदा घेत तेथे न पोहोच करता व गाडी मालक यांना काही एक कल्पना न देता ऐशियन पेन्टस कंपनीमधील रंगाचे डबे व ट्रक हा विश्वासघात, फसवणुक करून सोबत घेवुन गेला हे लक्षात आले असता मोहनलाल नोपाराम शर्मा वय 46 यांनी शिरवळ पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत याबाबत फिर्याद दिली असून पुढील तपास शिरवळ पोलीस करीत आहेत.