शिक्रापूर प्रतिनिधीः शेरखान शेख
वढू बुद्रुक ता. शिरुर येथे पत्नी व मुलीला घेण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीसह त्यांच्या वडिलांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रणजीत बाळू चव्हाण व राजकिरण दादू चव्हाण या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वढू बुद्रुक ता. शिरुर येथे अमित अवचिते हे त्यांच्या पत्नीच्या व मुलीला घेऊन जाण्यासाठी आपल्या वडिलांसह आले होते. यावेळी पत्नीचा भाऊ रणजीत तसेच चुलत भाऊ राजकिरण यांनी अमित व त्याच्या वडिलांना शिवीगाळ, दमदाटी करीत मारहणा केली. तसेच येथे का आला आहे, असा जाब देखील विचारला. या घटनेत अमित राजू अवचिते व राजू अवचिते हे दोघे जखमी झाले असून, याबाबत अमित राजू अवचिते (वय ३० वर्षे रा. केदारी नगर वानवडी ता. हवेली जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रणजीत बाळू चव्हाण व राजकिरण दादू चव्हाण या दोघांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र पाटील हे करीत आहेत.