नुकतीच महायुती सरकारची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये महायुती सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा लेखाजोखा रिपोर्टकार्डच्या माध्यमातून मांडला. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महायुतीमधील नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यत्री यांनी सरकारने घेतलेले निर्णय, कामे, योजना आदीबद्दल माहिती देत विरोधकांवर टीकास्त्र डागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना अजित पवार मान खाली घालून खुदूखुदू हसत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
नेमकं घडलं काय?
महायुतीची पत्रकार परिषद सुरू होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. त्यांच्या डाव्याबाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार तर उजव्या बाजूला देवेंद्र फडणवीस बसले होते. यावेळी शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये तुम्ही २ ते ३ कोटींचा निधी दिला. आम्ही ३५० कोटींचा निधी दिला. हे जनतेचे पैसे आहेत. कोणी आमच्याकडे आला तर आम्ही सही करतो. तुमचे तर पेन पण काढत नव्हते…..ठेवत नव्हते…..यानंतर पुढे पॅाझ घेऊन शिंदे म्हणाले, हे बघा मला कोणावरही टीका करायची नाही. यावर अजित दादा मान खाली घालून खुदूखुदू हसत होते. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस देखील हसू लागले. पुढे शिंदे देखील हसले.


















