शिक्रापूरः येथील एका गावात राहणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थ्यीनीने तरुणाच्या सततच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शिक्रापूरमधील निमगाव भोगी या घडली आहे. आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव श्रावणी संतोष सांभारे (वय १७) वर्ष असून या प्रकरणी तिचे वडील संतोष सांभारे यांनी शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रणव अशोक उबाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर येथील महाविद्यालय श्रावणी ही शिक्षण घेण्यासाठी तिच्या मामाच्या गोलेगावात या ठिकाणी राहत होती. प्रवण हा तिला सतत रस्त्यात अडवून त्याच्यासोबत बोलण्यासाठी तिच्यावर दबाव देत होता. पण ती त्याच्याशी बोलण्यास नकार देत होती. याचा राग मनात धरून त्याने तिला तू शिक्षण घेत असलेल्या शाळेत व शाळेबाहेर बदनामी करेल अशी धमकी त्याने तिला दिली. या सततच्या त्रासाला कंटाळून श्रावणीने आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे या करीत आहेत.