Monday, June 8, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

सतीश वाघ अपरहण खून प्रकरणी मोठी अपडेट; शेजाऱ्यानेच केली गेम, खून करण्यामागच कारण आलं समोर

by Team Rajgad Publication
December 12, 2024
सतीश वाघ अपरहण खून प्रकरणी मोठी अपडेट; शेजाऱ्यानेच केली गेम, खून करण्यामागच कारण आलं समोर

पुणेः विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करुन खून करण्यात आल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. सतीश वाघ असे टिळेकर यांच्या मामाचे नाव असून त्यांचे शेवाळवाडी येथील एका हॅाटेलसमोरुन चार चाकी वाहनातून अपहरण करण्यात आले होते. यानंतर काही तासातच वाघ यांचा मृतदेह शिंदवणे येथील घाटात पोलिसांना मिळून आला. या घटनेत आता आरोपींचा शोध लागला असून वाघ यांच्या शेजारीच राहणाऱ्या एका तरुणानेच त्यांची सुपारी देऊन अपहरण करुन खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैयक्तिक वादातून ही सुपारी देण्यात आली असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी पवन श्यामकुमार शर्मा (वय ३०, रा. धुळे ), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय ३२, रा. फुरसुंगी ) तसेच अक्षय हरीश जावळकर आणि विकाश शिंदे यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील इतर संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. आतापर्यंत या गुन्ह्यात पाच जणांचा सहभाग असल्याचे उघड आले आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांत अपहरण व खून केल्याप्रकरणी विविध कलमानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

घटनाक्रम थोडक्यात 

  • आमदार टिळेकर यांचे मामा सतीश तात्याबा वाघ (वय ५८) हे सोमवारी ९ डिसेंबर नेहमीप्रमाणे मार्निंग वॅाकला गेले होते.
  • पहाटे साडेसहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर कारमधून आलेल्या चौघांनी त्यांचे अपहरण केले.
  • कारमध्येच त्यांचा गळा दाबून तसेच दांडक्याने व तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला.
  • खुनानंतर वाघ यांचा मृतदेह उरळी कांचन परिसरातील शिंदवणे घाटात टाकून आरोपी पसार झाले.
  • हा सर्व प्रकार अवघ्या तासा भरात घडला होता.

पोलिसांची वेगवान गतीने फिरवली तपासाची चक्रे 

अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी वेगवान गतीने तपासाची चक्रे फिरवत आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना केली. मात्र, वाघ यांचा थांगपत्ता पोलिसांना लागत नव्हता. याचवेळी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वाघ यांचा मृतदेह पोलिसांना उरळी कांचन येथे असलेल्या शिंदवणे घाटात मिळून आला. त्यानंतर पोलिसांनी सर्व घटनाक्रम लक्षात घेत अपहरण आणि खून या दिशेने आपला तपास सुरू केला. पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी शर्मा व गुरसाळे यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात अपहरण आणि त्यानंतर खून अशी प्राथमिक माहिती मिळाली आता प्रश्न होता खूनाचे कारण ?

शेजाऱ्यानेच केली गेम 

 

पोलिसांनी सुपारी देणाऱ्या अक्षय जा‌वळकर याला ताब्यात घेतले. चौकशीत अक्षय जावळकर हा पूर्वी भाडेकरू म्हणून सतीश वाघ यांच्याकडे राहत होता. त्यांच्यात पुर्वीच वादावादी झाली होती. याचा राग मनात धरून अक्षय याने शर्मा याला ५ लाख रुपयांची सुपारी देऊन हा खून घडवून आणल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे. असे असले तरी पोलिसांनी अक्षय व विकास शिंदे यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली असून अद्यापर्यंत ठोस कारण समोर आलेले नाही. या प्रकरणात आतापर्यंत ५ जणांचा सहभाग निष्पन्न झाला आहे.

गुन्हा गंभीर असला तरी तो वैयक्तिक कारणातून घडला आहे. पोलिसांनी ज‌वळपास साडे चारशे सीसीटीव्ही पडताळत युद्धपातळीवर तपास करून तिघांना अटक केली असून, या गुन्ह्यात १२० ब नुसार कलम वाढ केली आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. आरोपींना कडक शिक्षा होईल अशीच कारवाई होईल. पुणे पोलीस शहरातील कायदा-सुव्यवस्था आभादीत ठेवण्यासाठी तसेच गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी सज्ज आहेत. ही घटना वैयक्तिक कारणातून घडली आहे. जनतेला विश्वास देऊ इच्छितो की, पुणे यापेक्षाही अधिक शांतताप्रिय व सुरक्षित राहील व ते ठेवण्यासाठी पोलीस तत्पर आहेत. पोलिसांवर विश्वास ठेवावा.

– अमितेशकुमार, पोलीस आयुक्त

Tags: hadapsarpunecrimenewsrajgadnewssatishwaghyougesh tilekar
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
जेजुरीः कचरा डेपोजवळ आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

धक्कादायक....! जेजुरीनजीक असलेल्या 'या' गावात चोरीच्या उद्देशाने बहीण भावाला जबरी मारहाण; चार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group