साताराः जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्जाबाबात मदत आणि जामीन करुन देण्यासाठी दोन संशियत व्यक्तींनी न्यायालयाचे न्यायाधिश यांच्याशी संगनमत करुन पाच लाख रुपयांची लाच मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारमुळे सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणी सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार दोन संशियत व्यक्तींसह जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका तरुणीने सातारा पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता. माण), किशोर संभाजी खरात (रा. वरळी मुंबई), जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश धनंजय निकम आणि एका संशियत व्यक्ती विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकार दि. ३, ९ आणि १० डिसेंबर रोजी घडला असल्याचे तक्रार नमूद करण्यात आले आहे.
प्रकरण काय ?
या प्रकरणी तक्रार केलेल्या तरुणीच्या वडिलांचा जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज आहे. वरील संशियत एक व दोन यांनी न्यायाधिशांसोबत संगनमत करून जामीन मिळवून देण्याकरिता पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार लाच स्विकारण्याची तयारी दर्शवित १० डिसेंबरच्या दिवशी लाचेची रक्कम गाडीत आणून द्या, असे आनंद खरात आणि किशोर खरात या संशियतांनी तरुणीला असे सांगून लाच मिळवण्याचा प्रयत्न केला. असे तक्रारीत सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के करीत आहेत.