साताराः येथील पाटण तालुक्यात असणाऱ्या ढेबेवाडी गावातील नाईकबानगरमधील तरूणाने वाढदिवसाच्या दिवशी एका बंद खोलीत दोरीच्या साह्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्याच्या आत्महत्या करण्यामागचे नमके कारण समजू शकलेली नाही. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव अक्षय अशोक माने (वय २७) असे आहे. वाढदिवसाच्या दिवशी घरातून तो बाहेर पडला आणि त्याची शोधाशोध केल्यानंतर एका बंद असलेल्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये तो मिळून आला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत अक्षय माने याचा येथील नाईकबा येथे पूजेचे साहित्य विक्रीचे दुकान आहे. त्याचा वाढदिवस असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. यावेळी रात्रीच्या सुमारास मोबाईलला रेंज येत नसल्याने अक्षय घरातून बाहेर पडला. यानंतर बराच वेळ झाला तरी अक्षय घरी येत नसल्याने त्याच्या घरच्यांनी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. यानंतर ग्रामस्थांनच्या मदतीने त्याची शोधाशोध करण्यात आली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास येथील एका पडक्या घरात दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. घरातील भिंतीवर सॅारी असे लिहिण्यात आले आहे. या घटेनेमुळे अक्षय याने इतके टोकाचे पाऊल कसे उचलले याचा अनेकांना धक्का बसलेला आहे.