वाई: वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर विधानसभा मतदार संघात शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेला नागरिकांना मोठा प्रतिसाद दिला. यावेळी त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधला. यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विकास कामाबाबत त्यांनी नागरिकांना माहिती दिली. वाई शहरात शिवसेनेच्या संवाद यात्रेचा जोरदार झंजावात पाहिला मिळत आहे. पुरुषोत्तम जाधव यांनी वाई शहरातील महिलांशी थेट संवाद साधत त्यांना लाडकी बहीण योजनेसह शासनाच्या इतर योजनेबाबतची माहिती दिली.
यावेळी वाई विधानसभा युवा सेना योगेश फाळके, वाई तालुका उपतालुका प्रमुख गणेश सावंत, युवासेना वाई तालुकाप्रमुख गणेश पवार, वाई शहर युवा सेना किरण भगत, विभाग प्रमुख प्रदीप भिलारे, खंडाळा सचिन जाधव, तालुका उपतालुका प्रमुख सचिन धायगुडे, खंडाळा तालुका सहकारी साखर कारखाना संचालक भानुदास जाधव, अॅड उमेश पवार शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
जनसंवाद यात्रा महाबळेश्वर, वाई, खंडाळा या तीन तालुक्यांमध्ये १० दिवस सुरू असणार आहे. पुरुषोत्तम जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी यामध्ये सहभागी झालेले आहेत. महाराष्ट्रातील नारीशक्तीचा सन्मान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे क्रांतिकारी पाऊल उचलत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रत्यक्ष अंमलबजावणीत आणून इतिहास घडविला आहे. कुटुंबातील प्रत्येक महिलेला याचा फायदा होत असून आता वाई ,खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात देखील या निवडणुकीत महिला क्रांतिकारी बदल घडवतील. व आपल्या हक्काचा भाऊ विधानसभेत नक्की पाठवतील, असा विश्वास जाधव यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच पुरुषोत्तम जाधव यांनी वाई शहरात भव्य परिसंवाद यात्रा काढून तरुणांसोबत देखील संवाद साधला.
…आता घरचा रस्ता दाखविण्याची चर्चा
एकाच घरात आमदारकी, खासदारकी, जिल्हा बँक अध्यक्षपद, बाजार समिती संचालक पद, सरपंचपद यासह सर्व पदे घेणाऱ्या लोकप्रतिनिधींना आता घरचा रस्ता दाखवायचाच … अशी चर्चा वाई -खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात, पारावर सर्वच पक्षाचे कार्यकर्ते करू लागले आहेत.