मुंबई : राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना बदली झाली की लगेच संबंधित ठिकाणी जावे लागते. पण बदली झालेल्या ठिकाणी तात्काळ प्रभावाने न गेल्यास कारवाई होते. अशीच कारवाई महसूल विभागातील तब्बल 11 अधिकाऱ्यांवर झाली आहे. यामध्ये 4 उपजिल्हाधिकारी आणि 7 तहसीलदारांचा समावेश आहे. हे सर्व अधिकारी बदलीच्या ठिकाणी रुजू झालेच नाही. अखेर त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या अधिकाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी एप्रिलपासून अनेकदा कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आल्या होत्या. मात्र, या अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. (Big News) आपल्या आवडीप्रमाणेच पोस्टिंग मिळाली पाहिजे हा अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा नेहमीच आग्रह पाहायला मिळतो. यासाठी ते मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या माध्यमातून मनासारखी पोस्टिंग मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र, महसूल विभागाने या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.