हडपसरः राजगुरुनगरमध्ये खाऊच्या आमिषाने ४ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना आता अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक बलात्कार करुन धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी सुरेश भालेराव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित मुलाच्या वडिलांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा घरी झोपला होता. त्यावेळी सुरेश भालेराव हा घरी आला. त्याने मुलाची पँट काढून त्याच्याबरोबर अनैसर्गिक कृत्य करीत अत्याचार केला. मुलाने विरोध केल्यावर त्याला तुला रोहित वाईन्सला घेऊन जातो, मग आपण जेवायला जावू असे म्हणून कोणास काही सांगू नको, अशी धमकी दिली. या प्रकरणाी हडपसर पोलिसांनी आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रविण अब्दागिरे हे करीत आहेत.