मुंबईः विधानसभा निवडणुकीचे वातावरण असताना महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा येईल की महाविकास आघाडी किंवा काही वेगळं चित्र तयार होईल का हे निकालनंतरच स्पष्ट होईल. मात्र, राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचा गवगवा युतीमधील नेत्यांकडून केला जात आहे. यावरून मुख्यमंत्री कोणार याच्या देखील चर्चा झडू लागल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक विधान केले असून, राज्यात महायुतीचे सरकार आल्यास राजस्थान आणि मध्यप्रदेशसारखा प्रयोग राबविला जावू शकतो, असे तावडे म्हणाले आहेत. त्यांच्या विधानवर देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष रेसमधून नसून जीना यहाँ मरना यहाँ असे म्हणत देवेंद्र फडणवीस असा नट आहे, जो कुठेही फिट करू शकतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे एकीकडे तावडे यांनी केलेले विधान आणि फडणवीस यांनी दिलेला दुजोरा यामुळे आता अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.
एएनआय या वृत्तसंस्थेने देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली त्यावेळी ते बोलत होते. जर राज्यात भाजपचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आल्यास त्यावेळी काय निर्णय घेतला जाईल. या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनाः एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीः अजित पवार आणि भाजपचे पार्लामेन्टरी बोर्डमधील सदस्य बसून निर्णय घेतील. मी तर प्रादेशिक नेता आहे. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष या रेसमध्ये नाही, असे सूचक विधान फडणवीस यांनी केले आहे. पुढे ते म्हणाले, विनोद तावडे हे महामंत्री आणि राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे निकालानंतर यावर बोलणे अधिक उचित होईल.
उद्धव ठाकरे यांच्यासाठी दरवाजा बंद
सध्या राज्यात युती आणि आघाडी अशी लढत होत आहे. विधानसभेच्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी कोणतीही गोष्ट घडू शकते असे राजकीय जाणकार सांगतात. यामुळे राजकीय परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासाठी दरवाजा बंद असेल असे फडणवीस म्हणाले. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीने मला खूप काही शिकवले असून, उद्धव ठाकरे यांच्या त्यासाठी गरज भासणार नसल्याचे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले आहे.
शरद पवारांची मीडियात ECOSYSTEM
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची भर पावसातील सभा खूप गाजली होती. मीडियाने ही गोष्ट दाखविली, त्यानंतर पवार कसे जातात. त्यांचा लहेजा, वावार आदी गोष्ट दाखविण्यात येत असल्याचे म्हणत शरद पवार हे मीडियात एकप्रकारची एकोसिस्टिम चालवत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. त्यांना ५० वर्षांचा राजकीय अनुभव असल्याचे देखील यावेळी फडणवीस म्हणाले.