राजगडः वेल्हे (राजगड) तालुक्यातील आंबेगावच्या सरपंच पदी सुरेखा संतोष निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला.
याप्रसंगी आंबेगावच्या मा. सरपंच नीलिमा पासलकर, ग्रामपंचायत उपसरपंच सोनाली जागडे तसेच सदस्य सुनंदा जागडे, तालुका उपाध्यक्ष गणेश जागडे, अंकुश जागडे, बाळू तात्या पासलकर, साहेबराव पासलकर, कृष्णा जागडे, ज्ञानोबा पाटील, अशोक झगडे, काशिनाथ तात्या झगडे, पांडुरंग भाऊ पासलकर तसेच गावातील ग्रामस्थ व महिला मंडळ उपस्थित होते. याप्रसंगी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्कल राजपाल यादव, ग्रामसेवक चव्हाण उपस्थित होते.