राजगडः भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत कोळवडी गावातील तरुणांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये राजू चोरघे, राहुल लिम्हण, अक्षय चोरघे, दत्ता साळुंके, मयूर धामगावे, किरण साळुंके यांचा समावेश आहे. यावेळी संग्राम थोपटे यांनी या तरुणांचे पक्षात स्वागत करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच तालुक्यातील क्रीडा समितीच्या उपाध्यक्ष पदी विनायक जगन्नाथ साळुंके यांची निवड करण्यात आली असून, त्यांचा देखील सत्कार थोपटे यांनी यावेळी केला.
यावेळी राजगड तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज शेंडकर, उपाध्यक्ष गणेश जागडे, भोर -राजगड-मुळशी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष निलेश पवार, क्रीडा समिती अध्यक्ष रोहिदास पिलाणे, कोळवडीचे सरपंच बबन घाटे, संतोष लिम्हण, संतोष चोरघे, ग्रामपंचायत सदस्य सागर चोरघे, जगन्नाथ साळुंके, बाबा घाटे, पुंडलिक साळुंके, प्रवीण चोरघे, चेतन चोरघे, अभिषेक साळुंके, गोरक्षनाथ साळुंके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.