हैद्राबादः देशभरात पुष्पा २ ची क्रेझ पाहिला मिळत आहे. सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंग देखील मोठ्या प्रमाणावर झाल्याचे सांगण्यात येत आहे. पुष्पा पाहिण्यासाठी सिनेमागृहाबाहेर प्रेक्षकांच्या लाग लागल्याचे चित्र साऊथ भागात दिसत आहे. मात्र, हैद्राबाद येथे उसळलेल्या गर्दीत एका महिलेचा मृत्यू झाला असून दोघांचा प्रकृती चिंताजनकक असल्याचे सांगण्यात आले आहे. हा घटनेमुळे सिनेमाला गालबोट लागले आहे.
हैद्राबाद येथे काल दि. ४ नोव्हेंबर रोजी पुष्पा २ चा मुख्य कलाकार अल्लू अर्जुन सिनेमा पाहिला येणार असल्याची खबर वाऱ्यासारखी इथल्या नागरिकांत पसरली. यानंतर येथील एका नामांकित थिएटरबाहेर मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांना पाहण्यासाठी उसळला. काही वेळातच या जमलेल्या गर्दीने रौद्र रुप धारण केले. मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने गर्दी अनेकांचा श्वास कोंडत होता. या गर्दीत एक महिला होती. या महिलेचा देखील श्वास गुदमरला आणि तिचा मृत्यू झाला तर चेंगराचेंगर दोघांची प्रकृती चिंंताजनक असल्याचे हैद्राबाद पोलिसांनी सांगितले. गर्दी वाढत असल्याने गर्दी पांगवण्यासाठी नाईलाजाने पोलिसांना लाठी चार्ज करावा. या घटनेमुळे पुष्पा २ वर गालबोट लागल्याचे दिसत आहे.