कलानगरीः पुष्पा २ पिक्चर रिलीज झाला अन् पहिल्या दिवसापासून हाऊसफुल्लचा बोर्ड अनेक थिएटरबाहेर दिसायला लागला आहे. थिएटर मालकांनी केलेली तिकीटाची दरवाढ कायम असल्याचे सध्या तरी दिसत आहे. ५ डिसेंबर या दिवशी प्रदर्शित झालेल्या पुष्पा २ पिक्चरने अवघ्या चारच दिवसांत तब्बल ८०० कोटींची धुव्वाधार कमाई करीत अनेक पिक्चरचे रिकार्ड तोडले आहे. देशभरातून साडेपाचशे कोटींची कमाई पुष्पा २ पिक्चरने केली असून उर्वरित कमाई वेदेशातून करण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे बॅाक्स अॅाफिसवर पुष्पाचा जलवा कायम असल्याचे दिसते.
पिक्चरच्या पहिल्या दिवशीची कमाई ही साधारण सरासरी २५० कोटींच्या आसपास झाल्याचे सांगण्यात येते. आता देशातून आणि वेदेशातून मिळून पिक्चरनं ८०० कोटी आणि पुढे जाऊन १००० कोटींची यशस्वी घोडदोड करण्याचे दिसत आहे. फार कमी वेळात ही गोष्ट शक्य होणार असल्याचे पिक्चरच्या जाणकारांनी वर्तवलेली आहे. यामुळे राजमौली यांचा आरआरआर या पिक्चरने एक दिवसांत २२९ कोटी कमाई केली होती. त्या पिक्चरचा रिकाई देखील पुष्पा २ पिक्चरचनं मोडला आहे.