जेजुरीः पुरंदर विधानसभा मतदार संघातून आघडीचे उमेदवार संजय जगताप, महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे आणि अपक्ष उमेदवार म्हणून मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या तिन्ही नेत्यांकडून सासवडमध्ये रॅली आणि जाहीर सभेच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. विजय शिवतारे आणि संजय जगताप यांनी एकमेकांवर टीकास्त्र डागले. तर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले संभाजीराव झेंडे यांनी कोणावरही टीका न करता उमेदवारी अर्ज सादर केला. काल दि. २९ अॅाक्टोबर रोजी तालुक्यात मोठी राजकीय घडामोड घडली आणि संभाजीराव झेंडे यांना राष्ट्रवादी (अजित पवार) एबी फार्म देण्यात आला. यामुळे तालुक्यात सध्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राज्यात आघाडी आणि युतीमध्ये जागावाटपावरून मोठी रस्सीखेच झाल्याचे पाहिला मिळत आहे. अनेकांनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरीचे निशान फडविले आहे. पुरंदरमध्ये देखील यावरून वेगळी परिस्थिती नाही. आघीडीकडून संजय जगताप यांना उमेदवारी दिली जाणार हे ठरलेले होते. मात्र, संभाजीराव झेंडे यांना उमेदवारी मिळेल या आशेने त्यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर त्यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत अपक्ष निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार करीत अपक्ष म्हणून अर्ज भरला. मात्र, २९ अॅाक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी झेंडे यांना राष्ट्रवादीकडून एबी फार्म देण्यात आला.
यामुळे तालुक्यातील यंदाची विधानसभेची निवडणूक वेगळ्या आणि इंट्रेस्टिंग पॅाईन्टवर आलेली आहे. युतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे येथील राजकीय जाणकार सांगतात. प्रचाराला सध्या सुरूवात झाली असली तरी दिवाळीनंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग प्राप्त होणार असून, राजकीय रणनिती उमेदवारांकडून आखली जाणार आहे. यामुळे पुढील येणाऱ्या काळात पुरंदर-हवेलीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत.