पुणे: एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्यावर होत असलेल्या लैंगिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. संकेत राजेश मोहिले (वय २६, रा. धम्मपाल संघाजवळ, ३१८ भवानी पेठ आणि मोहननगर, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध पोलिसांनी लैंगिक अत्याचारांपासून संरक्षक कायद्यानुसार पोक्सो गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या मुलाच्या वडिलांना सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. आत्महत्या केलेला मुलगा आणि आरोपीची ओळख होती. आरोपीने या मुलाला आमिष दाखवत तळजाई टेकडीवर नेले होते. तेथे त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्याने मुलाबरोबर अश्लील कृत्य करून अनैसर्गिक अत्याचार केला. हा किळसवाणा प्रकार साधारण वर्षभरापूर्वी हा प्रकार घडला होता.
या प्रकाराचे आरोपीने मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढले होते. त्यानंतर आरोपीने या मुलाला धमकाविण्यास सुरुवात केली. तसेच त्याच्या मोबाईलवर संपर्क साधून पुन्हा हे कृत्य करण्याची सक्ती अटक केलेल्या नराधमाने केली. त्याच्याकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून या मुलाने १५ नोव्हेंबर रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.