पुणेः प्रचार करण्यावर बंधणे आली असली तरी अजूनही पुण्यातील अनेक भागांत उमेदवारांकडून छुप्प्या पद्धतीने प्रचार करण्यात येत आहे. शहरातील अनेक भागात पक्षाच्या ब्रीद वाक्यांचा वापर करून फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या वेळेतच उमेदवारांना प्रचार करण्याची मुभा होती. त्यानुसार दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंतची वेळ निवडणूक आयोगाने दिली होती. मात्र, असे असताना देखील सांकेतिक भाषेचा वापर करून फ्लेक्स लावण्यात आले आहेत. तसेच उमेवारांना जो अंक निवडणूक आयोगाने दिला आहे. तो अंक देखील फ्लेक्सवर ठळक अक्षरात लिहिण्यात आला आहे.
सदर फ्लेक्स खडकवासाला आणि शहरातील विविध भागात लावण्यात आल्याचे दिसून येत आहे. यामुळे या सगळ्यावर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. राम कृष्ण हरी असे एक वाक्य एका पक्षाचे ब्रीद वाक्य आहे, त्याचा भलामोठा फ्लेक्स लावण्यात आला आहे. प्रचार थांबला असला तरी अशा सांकेतिक भाषेचा वापर करून अजूनही प्रचार सुरू असल्याचे पाहिला मिळत आहे.