पुणेः येथील बावधन भागात लग्नाचे आमिष दाखवून पेशाने डॅाक्टर असणाऱ्या तरुणाने तरुणीचा छळ केला. या त्रासाला कंटाळून तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी हिंडवडी पोलिसांनी डॉ. शंतनु शरद चोप्रा (वय ३०, रा. संगमवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. मयत तरुणीच्या आईने हिंडवडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॅा. शंतनु याने फिर्यादी यांच्या मुलीला लग्न आमिष दाखवून लग्न करण्याचे वचन दिले होते. त्यानंतर तिला वारंवार मानसिक त्रास दिला. फिर्यादी यांच्या मुलीला एक दिवस घरी बोलावून तिच्याशी भांडण केले. तसेच मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास तिला घराबाहेर काढले. यावेळी तरुणीने एवढ्या रात्रीची मी कुठे जाणार असे म्हटल्यावर ‘कुठेही जाऊन मर, जीव दे, मला नको सांगू’, असे डॅा. शंतनूने म्हटले. या छळाला कंटाळून अखेर तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.


















