पुणे : गणेशोत्सव मिरवणूक म्हटली की लोकगीतांचा तडका हा असतोच. सध्या अनेक लोकगीते डिजेवर वाजविली जातात. इतर शोमध्येही अनेक लोकगीते सादर केली जातात. या वर्षीच्या गणेशोत्सव मिरवणुकीला सुप्रसिद्ध गीतकार “पप्पी दे पारुला फेम” हरीदास कड ‘पोरी तुझा पाहून गं टॅटू’, हे नवीन लोकगीत घेऊन आले आहेत. या लोकगीताला अनेकांनी पसंती दर्शविली आहे.
सध्या गणेशोत्सवात लोकगीतांना अधिक पसंती दिसत आहे. तरुण डिजेवर या नव्या लोकगीताची फर्माईश करत आहेत आणि त्यावर तरुणांची पावले थिरकत आहेत. (Pune news ) सध्या “पोरी तुझा पाहून गं टॅटू” या गाताची तरुणांमध्ये क्रेझ आहे. हे गीत सुप्रसिद्ध गीतकार हरिदास कड यांनी लिहिले असून, प्रसिद्ध गायक अक्षय गरडकर यांनी गायले आहे. या गाण्याला संगीत योगेश भवाळ यांनी दिले आहे. युट्यूबवर हे गाणे रिलीज झालेले आहे. या गाण्याबद्दल अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, नितीन कुमार बनसोडे, नृत्य दिग्दर्शक महेंद्र बनसोडे व इतरांनी ‘पोरी तुझा पाहून गं टॅटू’ हे गाणं उत्कृष्ट असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. (Pune news ) या गाण्याला सर्वांची नक्कीच मागणी असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.