Friday, June 5, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पारगांवः विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीसाठी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न

पारगांव केंद्रातील शिंदेवाडी शाळेत पार पडली परिषद

by Team Rajgad Publication
August 31, 2024

पारगांवः प्रतिनिधी धनाजी ताकवणे

शिंदेवाडी शाळेत ऑगस्ट महिन्याची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद घेण्यात आली. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक महिन्यात एक शिक्षण परिषद घेण्यात येते, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय आणि उपक्रमांबाबत चर्चा होते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढ करण्यासाठी जे प्रयत्न करण्यात येतात त्याबद्दल या शिक्षण परिषदेमध्ये चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन करण्यात येऊन त्याचा वापर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ते वाढीसाठी होत असतो. त्याच अनुषंगाने या वेळीची शिक्षण परिषद पारगाव केंद्रातील शिंदेवाडी शाळेत घेण्यात आली.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

या परिषदेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा हायस्कूल यांच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महिला पदाधिकारी यांना सुद्धा यामध्ये प्रशिक्षण देण्यात आले. सखी सावित्री मंच, विद्यार्थी सुरक्षा समिती, परिवहन समिती, त्याचबरोबर पास्को कायदा याविषयी सर्व शिक्षकांना त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व महिला पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या केंद्र परिषदेसाठीसाठी पारगाव केंद्रातील सर्व शाळांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष त्याचबरोबर महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिषदेसाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून नानगाव हायस्कूलचे चंद्रशेखर मिसाळ व पारगाव हायस्कूलचे शिंदे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर पारगाव केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख कैलास आढागळे यांनी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये शासनाच्या विविध जीआरचे वाचन करून दाखवले. त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा घडवून आणून योग्य प्रकारे शिक्षकांना मार्गदर्शन केले.

शिक्षकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न अडागळे सर यांनी या परिषदेमध्ये केला. ही केंद्र परिषद शिंदेवाडी शाळा, कवडेवाडी शाळा, मोसे बुद्रुक शाळा यांच्या नियोजनातून पार पडली. या शिक्षण परिषदेसाठी केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते. तसेच पारगाव ग्रामपंचायतचे सदस्य संभाजी ताकवणे, बाजीराव तांबे, सुमन चव्हाण हे देखील उपस्थित होते. केंद्रातील सर्व शाळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते. यामध्ये शिंदेवाडी शाळेचे अध्यक्ष सुनील चव्हाण, उपाध्यक्ष विशाल जेधे आणि माता पालक संघाच्या अध्यक्ष दिपाली काळे उपस्थित होत्या.

या परिषदेसाठी शिक्षक समितीचे अध्यक्ष बापूराव खळदकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदेवाडी शाळेचे मुख्याध्यापक संदीप थोरात, तर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम कवडेवाडी शाळेचे मुख्याध्यापक भानुदास भोसले, किसन दिवेकर यांनी केले. अक्का मोरे, अश्विनी खळदकर, आढाव मॅडम यांनी या नियोजनामध्ये सहभाग घेतला होता.

Tags: daundpargoanrajgadnews
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post

दर्शनः भोर विधानसभेतील ३ हजार नागरिक काशीविश्वेश्वरा चरणी होणार लीण; किरण दगडे पाटील यांचा अनोखा उपक्रम

ताज्या बातम्या

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा

दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा

June 4, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp us