मुंबईः येत्या ५ डिसेंबरला पुष्पा द रुल हा सिनेमा देशासह प्रदेशात रिलीज होत आहे. या पार्श्वभूमीवर या सिनेमातील मुख्य अभिनेता अॅायकॅान स्टार अल्लू अर्जन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना हे दोघेही देशभरातील विविध ठिकाणी जात सिनेमाचे प्रमोशन करीत आहेत. नुकत्याच या सिनेमाचा ट्रेलर लॅान्च सोहळा बिहारमधील पटना शहरात मोठ्या दिमाखात पार पडली. या सोहळ्याला तरुणांचा उदंड प्रतिसाद लाभला. यानंतर मुंबईत पुष्पा द रुल सिनेमाची प्रेस आयोजित करण्यात आली होती. या प्रेसला अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदाना आणि सिनेमाचे निर्माते उपस्थित होते. यावेळी अल्लू अर्जुने आपल्या मनोगताची सुरूवात कसं काय मुंबई म्हणत केल्याने टाळ्यांचा कडकडाटासह त्याचे स्वागत करण्यात आले.
५ डिसेंबला तब्बल १२ हजार ५०० हून अधिक स्क्रीनवर पुष्पा द रुल रिलीज करण्यात येणार आहे. हा सिनेमा तब्बल ६ वेगवेगळ्या भाषांमधून रिलीज करण्यात येणार आहे. तसेच उद्यापासून सिनेमाच्या अॅडव्हान्स तिकीट बुकिंगला सुरूवात देखील करण्यात येणार आहे. या प्रेसला उपस्थित असलेला अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना दोघांकडे सर्वांचे लक्ष वेधलेले होते. अल्लूने वेअर केलेल्या ड्रेसवर लाल रंगात वाईल्ड फायर लिहिलेले होते. तर रश्मिकाचा ब्लॅक रंगाचा ड्रेस सगळ्यांना भुरळ पाडत होता. या प्रेसमध्ये अल्लू आणि रश्मिकाने एकत्रित येत अंगारोका या गाण्यावर हुक स्टेप केली. यावेळी चाहत्याचा आनंद गगनात मावनेसा झाला होता.
पुष्पा द राईज या भागात साऊथची अभिनेत्री समंथाने ऊ अंटा वा या गाण्यावर एक आयटम स्वाँग सादर केले होते. या गाण्याला मोठी लोकप्रियता देखील मिळाली होती. या गाण्यासाठी समंथाने तब्बल ५ कोटी इतके मानधन घेतले होते. पुष्पा द रुलमध्ये मात्र समंथाच्या जागी साऊथची अभिनेत्री श्री लिलाने किसिक या गाण्यावर आयटम साँग सादर केले आहे. पण जशी क्रेझ ऊ अंटा या गाण्याला होती. तशी ती किसिंक या गाण्याला मिळाताना दिसत नाही.
माझ्या करिअरची सुरूवात आर्या या सिनेमाने केली. तब्बल २० वर्ष सिनेमा इंडस्ट्रीत काम करीत आहे. आर्यामध्ये मला सुकुमार यांनी ब्रेक दिला. त्यामुळे मला आज जे काही प्रसिद्ध मिळत आहे. त्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनीच पुष्पा बनवला आहे. या सिनेमासाठी ५ वर्षांची मेहनत असून, त्यामध्ये ३ वर्ष पुष्पा द रुल या सिनेमाला बनवायला लागलेले आहेत.
अॅायकॅान स्टार अल्लू अर्जून