भोरः तालुक्याचे आमदार व राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक संग्राम थोपटे (sangram thopate) यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याची २०२३-२४ ची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेला कारखान्याचे संचालक, शेतकरी व नागिरक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विकास कामांमध्ये निधीच्या बाबतीत दुजाभाव केला जात आहे. खरंतर तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तुम्ही आम्हाला निवडून दिले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांची पिळवणूक झाली. ८ कोटी १३ लाख रुपयाचा तोटा कारखान्याला आहे. या वर्षीचा हंगाम आम्ही कारखान्याच्या वतीने सुरू करणार असल्याची खात्री कारखान्याचे संचालक व तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी उपस्थितांना दिली.
कामगारांच्या थकलेल्या वेतनासाठी चाचपणी सुरू
तसेच कामगारांचे थकलेले वेतन देण्याचा निर्णय झाला होता, परंतु काही कारणांमुळे काही गोष्टींचा विर्पयास झाला असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. त्यासाठीचा कायदेशीर लढा सुरू असून, कामगारांच्या थकलेल्या वेतनासाठी इतर गोष्टींने प्रयत्न करीत असल्याचे थोपटे यांनी बोलताना नमूद केले.
‘त्या’ मंडळींनी कारखाना अडचणीत आणण्याचे काम केलेः संग्राम थोपटेंचा हल्लाबोल
भविष्यामध्ये कारखान सुरू होणार याबद्दल जर कोणी विचारल तर त्याचे उत्तर हो आहे, त्यामध्ये कुठलीही शंका बाळण्याचे काही कारण नाही. अशा परिस्थितीमध्ये कारखान्याला अडचणीत आणण्याचे काम त्या सर्व मंडळीनी केले आहे, त्या मंडळीचा बंदोबस्त भविष्याच्या दृष्टीने करणार असल्याचे म्हणत विरोधकांचे कान टोचले. पुढे ते असे म्हणाले, ही संस्था संग्राम थोपटे यांच्या मालकीची नाही किंवा एका संचालकाच्या नावाची देखील नाही, तुम्ही दिलेल्या भागभांडवलातून कष्टातच्या रुपातून उभी राहिलेली संस्था म्हणजे राजगड सहकारी साखर कारखाना असल्याचे थोपटे म्हणाले. दोष असणाऱ्या सगळ्या कारखान्यांना तुम्ही कर्ज देताय, तर मग आम्हाला का देत नाही असा सवालही त्यांनी सरकारला केला आहे. सुनावनीच्या वेळी कर्ज भरले नाही, अमूक थकबाकी बाकी आहेत अशा एक ना अनेक तृटी काढण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
साखरआयुक्तांपासून अनेकांच्या भेटी घेतल्या
आ. संग्राम थोपटे यांनी साखर आयुक्तांपासून अनेकांच्या भेटी घेतल्या. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची देखील भेट घेतली. त्यांना सांगितले की मंजूर झालेले कर्ज आहे, त्याचे केवळ वितरण करणे बाकी आहे. मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर आले नसल्याचे थोपटेंनी सांगितले. तसेच उच्चन्यायालयाने तृटींची पूर्तता करण्यास सांगितले असून, येत्या दोन दिवसांमध्ये त्याचे सादरीकरण करण्यात येणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
१५ नोव्हेंबरनंतर कारखाना सुरू करणार असल्याचे दिले संकेत
मंजूर झालेले कर्ज पण तुम्हाला लोकसभेत अपेक्षित यश मिळाले नाही, म्हणून तुम्ही आमच्यावर खापर फोडण्याचे काम करत असाल तर या सारखे दुसरे दुर्देव नसल्याचे थोपटेंनी नमूद केले. सभासद शेतकरी, कामगारांना तुमचं काय घोडं मारल आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्य सरकाने निर्णय घेतला आहे की, १५ नोव्हेंबरनंतर सहकारी साखर कारखाना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे १५ नोव्हेंबरनंतर कारखाना सुरू करण्यात येणार असल्याचे थोपटे यांनी सांगत उपस्थितांना आश्वस्त केले आहे.