सह्याद्री फिल्मस प्रस्तुत येक नंबर (yek number) या सिनेमाचा ट्रेलर प्रर्दर्शित झाला आहे. या ट्रेलर लॅान्चला इंटस्ट्रीमधील अनेक दिग्यज्य कलाकारांली हजेरी लावली. यामध्ये इंडस्ट्रीतील नावाजलेले दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आषितोष गोवारीकर, साजिद खान, आमिर खान, साजिद नाडियडवाडा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ट्रेलर लॅान्च सोहळा संपन्न झाला. येत्या १० अॅाक्टोबरला हा सिनेमा थेएटरमध्ये रिलीज होणार असून, सिनेमाच्या धमाकेदार ट्रेलरने अनेकांची मने जिंकली आहेत.
सिनेमात धैर्य आणि सायली या नवोदित कलाकरांची जोडी पाहिला मिळणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन राजेश मापुस्कर यांनी केले आहे, तर निर्माते म्हणून प्रथमच अभिनेत्री तेजस्विनी पंडित (tejasvini pandit) यांनी जबाबदारी घेतली आहे. त्यांच्या सोबत वरदा नाडीयडवाडा या देखील निर्मात्या आहेत. सिनेमातील दोन गाण्यांना अजय-अतुल यांचे संगीत लाभले आहे. सिनेमाचे लेखक अरविंद जगताप आहेत. या सिनेमाच्या कथेचे बीज या सिनेमात काम करणारा प्रमुख अभिनेता धैर्य याच्याकडे आल्याचे सांगितले जात आहे.
काय आहे स्टोरी?
या सिनेमाच्या ट्रेलरमधून मोठ्या प्रमाणावर सेटचा वापर करण्यात आल्याचे दिसून येत आहे. सिनेमातील मुख्य नायक प्रताप याला आमदार व्हायच, तर मुंबई जाऊन महाराष्ट्र सिनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thakare) यांना भेटायचं आहे. त्यासाठी तो मुंबईत गेल्यानंतर त्याच्यासोबत काय होतं, तो खरचं राज ठाकरे यांना भेटतो का, यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल. सिनेमात लव्हस्टोरी देखील असणार असून, प्रतापच्या प्रेयसीच प्रतापला राज ठाकरे यांना गावात आणलं तर लग्न करणार असे म्हणते. तिथूनच खरा प्रताप ही गोष्ट करण्यासाठी जीवाचे रान करतो असे ट्रेलरमधून तरी दिसत आहे. सायली या नवोदित अभिनेत्रीने पिंकी नावाचे पात्र सिनेमात साकारले आहे. याच बरोबर सिनेमात अनेक कलाकारांचा अभिनय पाहिला मिळणार आहे.
सिनेमात राज ठाकरे दिसणार?
सिनेमाच्या ट्रेलरमधून राज ठाकरे यांच्या सभेतील आवाज दिसतो. ते सिनेमात पाहिला मिळणार याचे उत्तर सिनेमा पाहिल्यानंतर देता येईल. मात्र, सिनेमाच्या ट्रेलरमधील राज ठाकरे यांचा आवाज म्हणजे सिनेमाचा आत्म आहे, असे म्हटले तर वावगे वाटू नये.
सभेच्या सीनसाठी १२ कॅमेऱ्यांचा वापर
हा सिनेमा मोठ्या स्केलवर तयार करण्यात आल्याचे ट्रेलरमधून दिसून येत आहे. राज ठाकरे यांनी देखील सिनेमा अधिक चांगला होण्यासाठी सिनेमात अनेक गोष्टी सूचविल्या असल्याचे खुद्द राज ठाकरे यांनी बोलतना सांगितले आहे. या सिनेमात सभेचा सीन आहे, या सीनसाठी एकावेळी तब्बल १२ कॅमेऱ्यांचा वापर करुन हा सीन शूट करण्यात आल्याचे दिग्दर्शकांनी सांगितले आहे.