इंदापूरः तालुक्यात गोळीबाराची घटना ताजी असतानाच भिगवण नजीक असलेल्या एका गावातील मुलीशी तरुणाने मैत्री करुन तिला लॅाजवर नेत तिच्याशी शारिरीक संबध ठेवले. यानंतर तिला ब्लॅकमेल करीत विवाह करण्यासाठी प्रवृत्त केले. तसेच मुस्लिम पद्धतीने विवाह करुन आई-वडिलांच्या विरोधामध्ये तक्रार द्यायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या नातेवाईकांसह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
घरच्यांच्या विरोध
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी भिगवण नजीकच्या एका शाळेत शिकत असताना त्याच शाळेत शिक्षण घेत असलेल्या नासिर सिकंदर मुलानी याने तिच्याशी ओळख वाढवली व तिला फिरायला नेले. तिथे त्याने एक फोटो काढून तो एडिट करून त्याचा व्हिडिओ केला. घरच्यांना हे समजल्यानंतर घरच्यांनी यास विरोध केला. यामुळे पीडित मुलीने त्याच्याशी ओळख थांबवली.
लॅाजवर नेत ठेवले शारीरिक संबंध
इंदापूर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या नासिरच्या मेहुणीने पुन्हा पीडित मुलीची भेट घेत त्याच्याशी ओळख करून दिली. दोघांच्यामध्ये मध्यस्थी करून नोव्हेंबर 2023 मध्ये भिगवण येथील एका लॅाजमध्ये तिला शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडले. असा आरोप पीडित मुलीने केला आहे. त्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये याच लॉजवर या पीडित मुलीशी नासिरने शारीरिक संबंध ठेवले. मात्र हा लॅाज त्याच्याच मित्राचा असल्याने याची नोंद ठेवण्यात आलेली नाही, अशी माहिती मिळत आहे.
बळजबरीने विवाह करण्यास केले प्रवृत्त
नासिरने पीडित मुलीला 20 मार्च 2024 रोजी इंदापूर येथे रजिस्टर लग्न करण्यासाठी नेले. पीडित मुलीला कागद न वाचता आल्याने तिला जबरदस्तीने संमती घेऊन मित्राच्या साथीने अकलूज येथे नेते मुस्लि विधी करण्यात आला. नासरच्या आईने तसेच त्यांच्या नातेवाईकांनी राजेगाव या परिसरात आणले. मुलीला तिच्या आई-वडिलांविरोधात तक्रार देण्यासाठी धमकावले. याला बळी पडून पीडितेने आई-वडिलांविरोधात जबाब दिला. या घटनेनंतर आई-वडिलांनी या मुलीला परत घरी नेले. तेव्हा नासिर याने तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले.
दारु पाजली, इतर पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवण्याची केली विचारणा
पीडित मुलगी जेव्हा स्वतःच्या घरी गेली, तेव्हा नासिर याने पीडित मुलीच्या चुलत भावाला व चुलतीला आमिष दाखवून मुलीला बारामतीत येथील जळोची येथे आणले. दोन महिन्याच्या काळात चुलतीने नासिर याच्याशी पीडितेला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले. तसेच चुलतीने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी मुलीला दारू पाजली तसेच इतर पुरुषांशी संबंध ठेवणार का? अशी विचारणा देखील केली असल्याचे पीडित मुलीने तक्रारीमध्ये म्हटले आहे. तसेच नासीरने वेळोवेळी अत्याचार करून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले व जबरदस्तीने पीडितेला मांस खायला घातले असल्याचे देखील पीडितेने तक्रार म्हटले आहे. अशी तक्रार या मुलीने केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी नासिर सिकंदर मुलाणी व परविन मुलाणी या दोघांसह पीडित मुलीच्या जवळच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी पोक्सो कायद्यासह बालकांच्या लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमनुसार गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून, या घटनेमुळे माणसुकी राहिली आहे की नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.