गुहागरः निवडणुकीच्या आखाड्यात मनसेच्या इंजिनाने धावायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे विविध ठिकाणी सभा घेत असून, सभेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. गुहागर येथे राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेतून राज यांनी राजकारण्यांवर टीकेचे बाण सोडले. यावेळी राज यांचे भाषण सुरू असतानाच समोर उभ्या असलेल्या एका मुलीच्या हातातला बोर्ड पाहून त्या बोर्डवर काय लिहिले आहे, हे वाचण्याचा प्रयन्न राज यांनी केला. यानंतर त्यांनी सध्याच्या राजकीय गोष्टींचा मागोवा घेत राजकारण्यांवर टीकेची झोड उठवली.
या मुलीने हातामध्ये एक बोर्ड धरला होता. या बोर्डवर राज ठाकरे तुम्ही मुख्यमंत्री व्हा…! असे लिहिले होते. हे वाचून राज काही वेळ हसले आणि पुन्हा त्यांनी भाषणाला सुरूवात केली. यावेळी ते म्हणाले पहिलं हातात तर द्या आमच्या! या गोष्टींचा दाखला देत पुढे राज म्हणाले, शाहरूख, सलमान यांचे चित्रपट पडले तर ते पुन्हा नवीन चित्रपट काही दिवसांमध्ये सुरू करू शकतात. मात्र, निवडणुका ही गोष्ट वेगळी आहे. यासाठी तुम्हाला पुढच्या ५ वर्षांची वाट पहावी लागते. वेळ ही कोणासाठी थांबत नाही. महाराष्ट्राला कोकण लाभलेले आहे, किती सुंदर बनवू यासाठी प्रयत्न केला पाहिजे. शेजारचे गोवा राज्य हे टुरिझिम सुरू आहे.