दिवाळीत नवी खरेदी केली जाते. खंमंग फराळाचा आस्वाद घेतला जातो. भटंकती केली जाते. दिवाळी अंक बाजारात दाखल होतात. दिवाळी पहाट कार्यक्रमांची रेलचेल असते. नातेवाईकांसोबत छोटेखानी भेटीगाठी होतात. अशा एक ना अनेक गोष्टी खऱ्या अर्थाने दिवाळीत होत असतात. दिवाळीत मनोरंजनाला देखील तितकीच पसंती मिळत असते. उद्या १ नोव्हेंरला देशभरात संघम अगेन आणि भुल भुलैय्या ३ हे दोन बडे सिनेमे प्रदर्शित होत आहेत. दोन्ही सिनेमे बिग बिजेट असून, सिंघम फ्ररेंचायस चा पुढचा भाग म्हणजे सिंघम अगेन आहे. भुल भुलैय्या सिरीजमधील हा भाग तीन आहे. असे असले तरी सिनेमा प्रदर्शित झाल्यावर त्यातील कथानक पूर्णपणे वेगळे असणार आह. असे या सिनेमांच्या ट्रेलरमधून दिसत आहे.
सिंघम अगेन…
सिंघम अगेनमध्ये अजय देवघण, अक्षय कुमार, जॅकी सराफ, रणवीर सिंग, अक्षय कुमार, अर्जुन कपूर, करीना कपूर खान, दिपिका पादुकोन हे कलाकार आहेत. रोहित शिट्टीचा पिक्चर म्हटलं की गाड्यांची फोडाफोडी, अॅक्शन असणार नाही असे होणार नाही. तब्बल ५ मिनिटांच्या ट्रेलरमधून सिनमाची थोडक्यात माहिती मिळते. सिनेमा रामायणाच्या कथानक घेऊन पुढे जाणार आहे. त्याचे संदर्भ दिसतात. रामायणातील सीतेचे हरण या भागावर सिघम अगेन सिनेमाची स्टोरी असल्याचे सांगितले जात आहे. लेडी सिंघम म्हणून अभिनेत्री दिपिका पादुकोनचा नवा अवतार या सिनेमात पाहिला मिळणार आहे. अर्जुन कपूर हा विलनच्या भूमिकेत आहे. सीआयडीमधला दया देखील ट्रेलरमध्ये दारांवर लाथ मारताना दिसत आहे. टॅायगर श्रॅाफची, रणवीर सिंग, अक्षय कुमार आणि दिपीका पादुकोण यांची एन्ट्री हटके आहेत.
भुल भुलैय्या ३…
भुल भुलैय्या सिनेमाचे दोन्ही भाग प्रचंड चालले. दोन्ही भागांना प्रेक्षकांची उस्फुर्त दाद मिळाली. याच्या पुढच्या भागात विद्या बालनने कम बॅक केले असून, माधुरी दिक्षित नव्याने दाखल झाली आहे. तसेच अनेक कलाकार या भागात नवे पाहिला मिळणार आहेत. दुसऱ्या भागात असलेल्या कार्तीक आर्यने या भागात मुख्य भूमिकेत आहे, तर त्याची साथ द्यायला दिप्ती डिमरीने असणार आहे. अॅनिमलनंतर दिप्ती डिमरीने सगळ्यांना घायाळ करून सोडले आहे. सिनेमात डॅार्क कॅामेडी असणार आहे. माधुरी दिक्षित वेगळ्या भूमिकेत आहे. भुताची भूमिका माधुरीने या आधी केलेली नाही. यामुळे तिला अशा वेगळ्या अवतारात पाहिणे म्हणजे वेगळा अनुभव असणार आहे. सिनेमाची स्टोरी लाईन पूर्णपणे ट्रेलरमधून दिसत नसली तरी अगोदर असणाऱ्या सिनेमात जशी स्टोरी होती. त्याच धर्तीवर काहीसे वेगळ रुप देऊन हा सिनेमा असणार आहे.
मराठीत एकही सिनेमा नाही
दिवाळीच्या शुभ मूहर्तावर हिंदीत दोन बड्या सिनेमांचे क्लॅश होत असाताना दुसरीकडे मराठात एकही सिनेमा रिलीज होणार नाही. यामुळे मराठी अॅाडियन्सला यो दोन पैकी एका सिनेमाकडे आपला मोर्चा वळवावा लागणार आहे. दोन्ही सिनेमांना मोठ्या प्रमाणावर शोज मिळालेले आहेत. यामुळे कोणत्या सिनेमाची दिवाळी साजरी होते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.