लोणंंदः येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या १६ वर्षीने मुलाने महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देवराज प्रशांत धोतरे (वय १६ वर्ष रा. अकलूज, ता. माळशिरस) असे गळफास घेतलेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी मयत मुलाच्या मावसभावाने लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील पाडेगाव ता. खंडाळामधील असलेल्या महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोलीमध्ये २५ सप्टेंबर रोजी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास खोलीतील खिडकीच्या लोखंडी गजाला दोरउडीच्या दोरीच्या साह्याने देवराज याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणंद पोलीस करीत आहेत.