लोणावळा प्रतिनिधी : राजगड न्युज
लोणावळा : दोन बालकांसह महिलेचे अपहरण करून त्यांना मारहाण करत त्यांच्याकडून घरातील काम करून घेवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका टोळीचा पुणे ग्रामीण एलसीबी पथक व लोणावळा शहर पोलिसांनी पर्दाफाश करत दोन बालकांसह एका महिलेची सुटका केली.
सोबतच जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले. अशी माहिती लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा पोलिसांनी राज सिद्धेश्वर शिंदे (वय 25 वर्षे, रा. क्रांतीनगर, कुसगाव) व ज्ञानेश्वर रामभाऊ लोकरे (वय 41 वर्षे, रा. क्रांतीनगर, कुसगाव) यांना अटक केली आहे. तर एकूण दहा जणांच्या या टोळीमध्ये दोन विधीसंघर्षग्रस्त बालक, तीन महिला, पाच पुरूष असून त्यांच्यापैकी दोन पुरूष आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना येरवडा पुणे येथील बाल निरीक्षण गृह येथे ठेवण्यात आले आहे. इतर सहा आरोपींचा शोध चालू असल्याचे सत्यसाई कार्तिक यांनी सांगितले.
या घटनेची सविस्तर माहिती अशी, की लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांना लोणावळा परिसरातील क्रांतीनगर येथील एक टोळी हनुमान टेकडीवर फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांना मारहाण करून लुटमार करतात तसेच त्यांनी एक अल्पवयीन मुलगी व एका महिलेस पळवून आणून त्यांना मारहाण करून डांबून ठेवून त्यांच्याकडून काम करून घेत असल्याची माहिती मिळाली. या माहिती आधारे त्यांनी तपास सुरू केला.
या तपासात पोलिसांनी ज्ञानेश्वर रामभाऊ लोकरे आणि राज शिंदे याला 17 सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले. या वेळी तपासात राज याने साथीदारांच्या मदतीने सहारा ब्रीज जवळ फिरण्यास आलेल्या पर्यटकांना चाकू व कुऱ्हाडीने मारहाण करत जबरदस्तीने त्यांचे कपडे, मोबाईल व रोख रक्कम चोरी केल्याचे कबूल केले.
तर राज शिंदेजवळ मिळून आलेला मोटोरोला कंपनीचा मोबाईल (Lonavala) हा त्याच घटनेतील असल्याचे त्याने सांगितले. दुसरी घटना 23 जानेवारी 2023 रोजी याच टोळीने लोणावळा ब्रीजजवळ डोंगराच्या पायथ्याला पर्यटकांना मारहाण करून लुटले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
जबरी चोरीचे हे दोन्ही गुन्हे लोणावळा शहर पोलीस स्टेशनला दाखल होते. राज शिंदे व ज्ञानेश्वर लोकरे यांची आधीम कसून चौकशी केली असता त्यांनी चालू सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात एका महिलेस लोणावळा स्टेशनच्या बाहेरचाकूचा धाक दाखवून पळवून नेऊन तिच्याकडील मोबाईल व रोख रक्कम काढून घेत तिला मारहाण करून, तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचेही कबूल केले.
सदर महिलेची राज शिंदे याच्या घरातून सुटका करण्यास गेले असता पोलिसांना आणखी दोन बालके कोंडून ठेवलेली सापडली. या तिघांची पोलिसांनी सुटका केली.
या दोन बालकांपैकी एक अल्पवयीन मुलगी व अल्पवयीन मुलगा आहे. तर त्यांची विश्वासात घेवून विचारपूस केली असता, दुसऱ्या गुन्ह्याचाही पर्दाफाश झाला.
9 सप्टेंबर रोजी राज शिंदे, त्याची पत्नी यांनी इतर साथीदारांच्या (Lonavala) मदतीने लोणावळा स्टेशनच्या बाहेर मोटार सायकलवर मुलांना जबरदस्तीने बसवून पळवून आणून घरात साखळीने बांधून डांबून ठेवले. लहान मुलीला उपाशी ठेवून घरातील काम करायला लावून हाताने, सळईने मारहाण केली तसेच तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले असून अल्पवयीन मुलास मारहाण करून त्यास डांबून ठेवून त्याच्याकडून देखील कामे करून घेत असल्याची माहिती समोर आली.
पिडीत अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाशी संपर्क करून तीच्या आईच्या फिर्यादीवरून पोक्सो ॲक्ट सह अन्य कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पिडीत महिला व अल्पवयीन मुलीच्या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाईं कार्तिक (भा.पो.से.) लोणावळा विभाग करत आहेत.