जेजुरीः आघाडीचे उमेदवार यांच्या अर्ज नामनिर्देशनानंतर भरल्यानंतर जाहीर सभेला खासदार सुप्रिया सुळे यांनी संबोधित केले. सुळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर धारेवर धरीत टीकास्त्र डागले. सध्याच्या राजकारण एका वेगळ्याच पातळीवर येऊन ठेपले असून, त्याचा राग येत असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. तसेच पुरंदरमध्ये एकच उमेदवार त्याचे नाव संजय चंदुकाका जगताप असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभेला दाखविलेल्या विश्वासाबद्दल सुप्रिया सुळे यांनी पुरंदर-हवेलमधील जनतेचे आभार मानले. संजय जगताप यांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले.
काही लोकं संजय जगताप यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप करतात. ते साफ खोटं असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संजय हे शब्दाला पक्का असणार माणूस आहे. जेवढे तुम्ही लोकसभेला पळाला आहात तुवढे किंबहुना त्याहूनही जास्त आता विधानसभेला पळा असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. सध्याच्या गलिच्छ राजकारणाची सुरूवात अदृष्य शक्तींनी केली असल्याचा आरोप त्यांनी कोणाचेही नाव न घेता केला. आम्ही सर्वजण म्हणजेच राष्ट्रवादी(शरद पवार) आणि शिवसेना (उबाठा) ओरिजिनल आहे. लोकसभेनंतर बहिल्या दिसल्या असल्याचा सवाल करीत बहिणींच्या प्रेमाचा बाजार मांडला असल्याचा घणाघाती आरोपी सुळे यांनी राज्य सरकारवर केला.
आघाडीचे सरकार आल्यावर महिला सुरक्षतेला प्राधान्यः सुप्रिया सुळे
राज्यात आघाडीचे सरकार आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा महिलांच्या सुरक्षितेचा मुद्दा हाती घेण्यात येईल. असा शब्द आघाडीच्या वतीने देत असल्याचे सुळे यांनी सांगितले. बापदेव घाटात झालेल्या सामूहिक बलात्काराची घटना वेदना देणार असल्याची त्या म्हणाल्या. आर. आर. आबा यांच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना होत होत्या का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.