भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
भोर –पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे व भोर तालुका विधी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान व राष्ट्रीय शिक्षण दिनाचे औचित्य साधून भोरमधील छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेज येथे उपस्थित विद्यार्थ्यांना कायदेवषियक मार्गदर्शन बुधवार (दि२९) करण्यात आले.
सदर कायदेविषयक मार्गदर्शन भोरच्या दिवाणी न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश नेहा नागरगोजे यांनी केले. उपस्थीत विद्यार्थी व विद्यार्थिनींना समजेल अशा एकदम सोप्या भाषेत त्यांनी भारतीय सविंधान व राष्ट्रीय शिक्षणाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच कायदेविषयक जनजागृती केली. विधीज्ञ ॲड मनिषा तारु यांनी राष्ट्रीय शिक्षण दिवस यासंबधी कायदेविषयक माहीती दिली व ॲड यशवंत शिंदे यांनी भारतीय संविधान दिवस यासंबधी कायदेविषयक माहिती दिली. यावेळी सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एम.सी.व्ही.सी. विभागप्रमुख प्रा.रविंद्र भालेराव यांनी केले. प्रास्ताविक ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख प्रा.संभाजी सरवदे व आभार प्रदर्शन प्रा. सलीम सिकलगार यांनी केले. सदर कार्यक्रमास भोर वकील संघटनेचे सचिव ॲड राकेश कोंडे तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे सहायक अधिक्षक महेश जोशी व तालुका विधी सेवा समितीचे लिपीक कैलास आखाडे व कॉलेजचे इतर प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कायदेविषयक कार्यक्रमास कॉलेजचे ४५० विद्यार्थी उपस्थित होते.